

सेऊल : दक्षिण कोरियामध्ये राहणार्या एका भारतीय महिलेला गर्भवती झाल्यावर कोरियन सरकारकडून लाखो रुपयांची आर्थिक मदत मिळाली. तिचा याबाबतचा अनुभव इन्स्टाग्रामवरून व्हायरल झाला आहे.
या भारतीय महिलेने दक्षिण कोरियन नागरिकाशी लग्न केले आहे. तिने ‘कोरियात गर्भवती झाल्याने मला मला खूप पैसे मिळाले,’ असा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओत तिने सविस्तर सांगितले आहे की, कोरियन सरकारने तिच्या गर्भधारणेच्या काळात, प्रसूतीनंतर आणि नंतरही नियमित स्वरूपात आर्थिक मदत केली.
गर्भधारणा स्पष्ट झाल्यावर चेकअप, औषधे आणि इतर गर्भावस्थेतील गरजांसाठी 63 हजार 100 रुपये, पब्लिक ट्रान्स्पोर्ट (बस, ट्रेन) वापरण्यासाठी 44 हजार 30 रुपये, बाळ जन्मल्यावर एकरकमी 1.26 लाख रुपये तिला व तिच्या पतीला देण्यात आले.
जेणेकरून बाळाच्या सुरुवातीच्या खर्चाचा भार हलका होईल. दर महिन्याची नियमित मदत बाळाच्या पहिल्या वर्षात 63 हजार 100 रुपये प्रतिमहिना, दुसर्या वर्षात 31 हजारे प्रतिमहिना, नंतर बाळाच्या आठव्या वर्षापर्यंत 12 हजार 600 रुपये प्रतिमहिना मदत दिली जाईल.