

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकन गायिका, परफॉर्मर, रिॲलिटी शोची जज केटी पेरी हिच्यासह इतर पाच महिलांनी सोमवारी अंतराळ प्रवास केला. ॲमेझॉनचे मालक अब्जाधीस जेफ बेझॉस यांच्या ब्लू ओरिजिनच्या रॉकेटमधून हा अवघ्या 11 मिनिटांचा अंतराळ प्रवास पार पडला.
या महिलांमध्ये केटी पेरी हिच्यासह जेफ बेझॉस यांच्या फियॉन्से (वाग्दत्त वधू) पत्रकार लॉरेन सांचेज, सीबीएस होस्ट गायल किंग, नासाच्या माजी रॉकेट वैज्ञानिक आयशा बोवे, वैज्ञानिक आमंडा ऍंग्युयन आणि चित्रपट निर्मात्या केरियान फ्लिन यांचाही समावेश होता.
मानवाने अंतराळात पहिल्यांदा झेप घेतल्याच्या 60 वर्षांतील सर्व महिलांचा सहभाग असलेले हे पहिलेच मिशन होते.
सीएनएनच्या अहवालानुसार, 14 एप्रिल 2025 च्या फ्लाईटमध्ये काही प्रवाशांनी फुकट प्रवास केला, तर काहींनी पैसे भरले. कंपनीने त्या प्रवाशांची माहिती देण्यास नकार दिला.
ब्लू ओरिजिनच्या रॉकेटमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 100 किलोमीटर (60 मैल) उंचीवर या सहा जणींनी हा एक छोटा प्रवास केला. ही रॉकेट कर्मन रेषेच्या पार गेले, जी अंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळाची सीमा मानली जाते.
वेस्ट टेक्सासहून सकाळी 9:31 वाजता या रॉकेटने उड्डाण केले होते आणि ते कर्मन रेषेच्या पार गेले. जी आंतरराष्ट्रीय पातळीवर अंतराळाची सीमा मानली जाते. तिथे या अंतराळ प्रवाशांना थोडा वेळ तरंगू लागल्याने वजनहीनतेची अनुभूती मिळाली त्यानंतर या सर्व जणी पृथ्वीवर परतल्या. या प्रवासाचा कालावधी सुमारे 11 मिनिटांचा होता, असे ब्लू ओरिजिनच्या लाईव्ह प्रसारणात सांगण्यात आले.
ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड अंतराळ यानामध्ये 6 प्रवासी अंतराळात जाऊ शकतात. 2021 मध्ये ब्लू ओरिजिनने आपला नागरिक अंतराळ कार्यक्रम सुरू केल्यापासून आत्तापर्यंत 58 लोकांनी अंतराळात प्रवास केला आहे.
कोणत्याही व्यक्तीला ब्लू ओरिजिन फ्लाईटवर अंतराळ प्रवास बुक करता येऊ शकतो, पण त्यांना खूप पैसे मोजावे लागतील.
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुकिंग्स केली जाऊ शकतात. अर्ज करणाऱ्यांना रिझर्व्हेशन पेजवर एक फॉर्म भरावा लागेल, ज्यात नाव, पत्ता आणि जन्म वर्ष यासारखी मूलभूत वैयक्तिक माहिती द्यावी लागेल.
त्यामध्ये एक विभाग आहे ज्यात प्रवाशांना 500 शब्दांमध्ये स्वतःबद्दल लिहायचे असते. फॉर्म भरण्यासाठी एकच अट आहे. ती म्हणजे अर्ज करणाऱ्याचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
ब्लू ओरिजिनच्या नागरिक मिशनचा खरा खर्च एक गूढ आहे कारण कंपनी त्याबद्दल खुलासा करत नाही. पण त्यांच्या वेबसाइटवर एक सूचना आहे की प्रवाशांना ऑर्डर प्रक्रिया सुरू करण्यासाठी 150000 डॉलर ठेव जमा करणे आवश्यक आहे. तथापि, ही रक्कम पूर्णपणे परत केली जाऊ शकते.
ब्लू ओरिजिनच्या पहिल्या मानवी अंतराळ प्रवासात 2021 मध्ये, एका सीटचा लिलाव 28 मिलियन डॉलरमध्ये झाला होता, असे 'न्यू यॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे तर ब्लू ओरिजिनची स्पर्धक कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकने अंतराळ प्रवासासाठी 200000 डॉलर ते 450000 डॉलर ऑफर दिली होती, असे 'असोसिएटेड प्रेस'ने म्हटले होते.
पण, सर्वांना अंतराळ प्रवास करण्यासाठी लाखो डॉलर्स भरावे लागणार नाहीत. स्टार ट्रेकच्या अभिनेता विल्यम शॅटनर आणि अमेरिकन टेलिव्हिजन होस्ट मायकेल स्ट्रहान यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड उपअंतराळ रॉकेटवर "अतिथी" म्हणून फुकट प्रवास केला होता.
सीएनएनच्या अहवालानुसार, 14 एप्रिलच्या फ्लाइटमध्येदेखील काही महिलांनी फुकट प्रवास केला, तर काहींनी पैसे भरले. तथापि, याबाबतचा तपशील कंपनीने उघड केलेला नाही. तथापि, केटी पेरी हिने मोफत प्रवास केल्याची चर्चा आहे.
तिच्यापुर्वी स्टार ट्रेकचा प्रसिद्ध अभिनेता विल्यम शॅटनर आणि टीव्ही पर्सनॅलिटी मायकेल स्ट्रहान यांनी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटवर "अतिथी" म्हणून मोफत प्रवास केला होता.