‍Bangladesh News | सेंट मार्टिन बेट अमेरिकेला दिले असते, तर मी सत्तेत असते

बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा मौनभंग
‍Bangladesh Protests sheikh hasina
बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा मौनभंगFILE PHOTO
Published on
Updated on

नवी दिल्ली : अमेरिकेला सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळेच माझे सरकार पडले. हे बेट देऊन टाकले असते, तर मी आजही सत्तेत असते, असे बांगला देशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले. ढाक्यातील सत्तांतरानंतर सहा दिवसांनी शेख हसीना यांनी निकटवर्तीयांच्या माध्यमातून बांगला देशच्या जनतेसाठी (मीडियाकरिता) जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे.

कट्टरतावाद्यांच्या हिंसाचारात बांगला देशींच्या मृत्यूचा आकडा मला फुगू द्यायचा नव्हता. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर चालत जाऊन सत्तेपर्यंत पोहोचायचे होते, असेही त्या म्हणाल्या. मी लवकरच बांगला देशात परतेन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेला सेंट मार्टिन बेटावर लष्करी तळ उभारायचा होता. हे बेट अमेरिकेला देणे म्हणजे बंगालचा उपसागर देऊन टाकणे आहे. देशहिताचा विचार करून मी तसे केले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आंदोलक विद्यार्थ्यांना मी कधीच रझाकार म्हटले नाही. देश अस्थिर करण्यासाठी हा प्रपोगंडा करण्यात आला. हे एक षड्यंत्र आहे. विरोधक सत्तेत आले तर ते हे बेट अमेरिकेला देऊन टाकतील, असे याआधीही शेख हसीना म्हणाल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय!

‍Bangladesh Protests sheikh hasina
Bangladesh Crisis: पीएम मोदींच्या युनूस यांना शुभेच्छा; हिंदूच्या सुरक्षेबद्दल काय म्हणाले...

11 बांगला देशी घुसखोरांना अटक!

कोलकाता : भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या 11 बांगला देशी नागरिकांना पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मेघालय या राज्यांच्या बांगला देशाला लागून असलेल्या सीमेवरून अटक करण्यात आली. सीमा सुरक्षा दलाने ही कारवाई केली. प. बंगाल, त्रिपुरा सीमेवर प्रत्येकी दोघांना, मेघालयातून सात जणांना अटक झाली. अटकेतील सर्वांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. असल्याचे बीएसएफच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, बांगला देशातील अल्पसंख्याकांवर होणार्‍या अत्याचाराबाबत बांगला देशाच्या लष्कराच्या संपर्कात असल्याचेही बीएसएफच्या वतीने सांगण्यात आले.

‍Bangladesh Protests sheikh hasina
Bangladesh Crisis | बांगला देशातील हिंदूच्या सुरक्षेसाठी समिती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news