पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशमधील सामूहिक हत्याकांड आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे मास्टरमाइंड हे अंतरिम सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुहम्मद युनूस हेच आहेत. त्यांनी विद्यार्थी समन्वयकांसह अत्यंत गौपनीयरित्या देशात सामूहिक हत्या घडवून आणल्या, असा गंभीर आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina) यांनी केला. न्यूयॉर्कमध्ये अवामी लीगच्या कार्यक्रमात व्हर्च्युअल संबोधित करताना त्या बोलत होत्या. बांगालादेशमध्ये मंदिरे, चर्च आणि इस्कॉन मंदिरांवर होणार्या हल्ल्यांचाही त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.
बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या हिंसक वळण लागले. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांना बांगलादेशमधून पलायन करुन भारतात आश्रय घेतला. सध्य त्यांचे वास्तव्य भारतात आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या पक्ष अवामी लीगने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्या व्हर्च्युअल सहभागी झाल्या. यावेळी त्या म्हणाल्या की, माझ्यावर बांगलादेशमधील सामूहिक हत्याकांडाचा आरोप केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात मुहम्मद युनूस यांनीच विद्यार्थी समन्वयकांसह अत्यंत गौपनीयरित्या देशात सामूहिक हत्या घडवून आणल्या. तेच सामूहिक हत्याकांडाचे सूत्रधार आहेत.
माझे वडील शेख मुजिबुर रहमान यांच्या प्रमाणे माझी हत्या करण्याचा कट आखला गेला होता. मी स्वत:कडेच सत्ता ठेवली असती तर बांगलादेशमध्ये नरसंहार झाला असता. माझी हत्या करण्यासाठी एक सशस्त्र जमाव पंतप्रधान भवनात आला होता; पण मी माझ्या सुरक्षा रक्षकांना गोळीबार न करण्यास सांगितले. माझ्या सुरक्षा कर्मचार्यांनी कायदा मोडणार्यांवर गोळीबार केला असतात तर अनेक जणांचा बळी गेला असता. हिंसाचार टाळण्यासाठी मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.