पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) याच्या निधनाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. थायलंडमधील ज्या हॉटेलच्या खोलीत शेन वॉर्नचा मृत्यू झाला होता तेथून एक बेकायदेशीर औषध हटविण्यात आले होते. या औषधाचा वॉर्नच्या मृत्यूमध्ये मोठा वाटा असू शकतो;परंतू याची नोंद पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नाही, असा दावा ब्रिटनमधील दैनिक 'डेली मेल'ने केला आहे. या दाव्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वा खळबळ उडाली आहे. ( Shane Warne's death)
'डेली मेल'च्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, शेन वॉर्नच्या मृतदेहाजवळ कामग्रा नावाचे औषध आढळले. हे औषध व्हायग्रासारखे मानले जाते. (पुरुषांमधील लैंगिक क्षमता तात्पुरती वाढवण्यासाठी व्हायग्राचा वापर केला जातो). थायलंडमधील एका पोलीस अधिकार्याने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, "तपास पथकाला शेन वॉर्नचे वास्तव असणार्या हॉटेलच्या खोलीतील औषधाची बाटली काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते.आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती बाटली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे आदेश अगदी वरच्या पातळीवरून येत होते. यामागे ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांचाही समावेश असवा. शेन वॉन याचा मृत्यूबाबत कोणताही वादग्रस्त मुद्दा उद्भवू नये अशी त्यांची इच्छा असावी."
कामग्रा हे औषध थायलंडमध्ये बेकायदेशीर आहे. ज्यांना हृदयरोग आहे त्यांच्यासाठी हे औषध विशेषतः धोकादायक मानले जाते. शेन वॉरचा मृत्यू झालेल्या खोलीत उलट्या आणि रक्ताचे डाग असल्याचेही अहवालात म्हटले आहे, परंतु अधिकाऱ्यांनी आदेशानुसार औषधाची बाटली काढून टाकली होती.
४ मार्च २०२२ मध्ये शेन वॉनचे वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडच्या हाॅटेलमध्ये निधन झाले होते. ते आपल्या मित्रांसोबत थायलंडला सुट्टी व्यतित करण्यासाठी गेले हाेते. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचा दावा थायलंड पोलिसांनी केला होता. मात्र हृदयविकाराचे कारण काय असू शकते, या प्रश्नाबाबत कोणताही तपशील नव्हता. कामग्रा औषधाची पुष्टी करण्यासाठी कोणीही बाहेर येणार नाही, कारण तो एक संवेदनशील विषय आहे. या सर्वामागे अनेक शक्तिशाली अदृश्य हात होते, असा दावाही संबंधित अधिकार्याने केला आहे.
शेन वॉर्न धूम्रपान करायचा त्याचबरोबर इतर सवयींमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. अत्यंत चुकीच्या जीवनशैलीमुळे शेन वॉनचा ५२ व्या वर्षी अकाली मृत्यू झाल्याचे ऑस्ट्रेलियातील डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले होते. १९९२ ते २००७ दरम्यान शेन वॉर्नने १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामने खेळले. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १००१ बळी घेणाऱ्या वॉर्नला क्रिकेट इतिहासात लेग स्पिनचा बादशाह अशी ओळख होती.