वांशिक हत्याकांडात अलवायटपंथीय टार्गेट

सीरियात दोन दिवसांत 1 हजार जणांची हत्या; 14 वर्षांनंतरचा भीषण नरसंहार
वांशिक हत्याकांडात अलवायटपंथीय टार्गेट
File Photo
Published on
Updated on

सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बसर असद यांचे समर्थक आणि सुरक्षा दलातील चकमकीतील मृतांचा आकडा दोन दिवसांत 1 हजारांवर पोहोचला आहे, अशी माहिती ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईटस्ने दिली आहे. सीरियामध्ये 14 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या यादवी युद्धानंतरची ही सर्वात भयंकर हिंसक घटना असल्याचे मानले जात आहे. या हिंसाचारात अलवायट पंथीयांना टार्गेट करण्यात आले आहे.

कोण आहे अलवायट समुदाय?

अलवायट हा सीरियातील एक धार्मिक अल्पसंख्याक गट असून ते देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 12 टक्के आहेत. अलवायट हा इस्लाममधील शिया पंथाचा एक उपपंथ आहे, जो मुख्यतः सीरिया, लेबनॉन आणि तुर्कीमध्ये आढळतो. मात्र, त्यांच्या प्रथा आणि परंपरा शिया पथीयांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत. बशर अल-असाद आणि त्यांचे कुटुंब हे अलवायट समुदायाचे असून त्यांनी डिसेंबर 2024 पर्यंत पाच दशके सीरियावर राज्य केले. त्यांच्या सत्ताकाळात अलवायट लोकांना लष्कर व सरकारी संस्थांमध्ये महत्त्वाची पदे मिळाली. त्यामुळे त्यांना विशेष वागणूक मिळते, अशी समजूत होती.

अलवायट समुदायाचे अनिश्चित भविष्य

बशर अल-असदच्या सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर सीरियातील अलवायट समुदाय मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी सत्तेच्या जवळ असलेले अलवायट आता विस्थापित सुन्नी पंथीयांकडून टार्गेट केला जात आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अलवायट समुदायातील लोकांचा सर्वाधिक समावेश आहे.

अलवायटपंथीयांची जवळून गोळ्या घालून हत्या

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात 125 सुरक्षा कर्मचार्‍यांचाही मृत्यू झाला आहे, तर अलवायटपंथीय 745 जणांची जवळून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. याशिवाय असाद समर्थक सशस्त्र बंडखोरांमधील 148 जण यामध्ये मारले गेले आहेत. सीरियन सुरक्षा दलांनी लाटाकिया प्रांतात किमान 162 अलवायट नागरिकांची थेट रस्त्यावर हत्या केली. हा प्रदेश असद यांचा बालेकिल्ला मानला जातो.

अलवायट समुदायावर हल्ले का होत आहेत?

असाद यांना पदच्युत केल्यानंतर नव्या सरकारशी संबंधित असलेल्या सशस्त्र सुन्नी गटांनी अलवायट नागरिकांवर हल्ले सुरू केले. हा हिंसाचार सीरियातील वांशिक संघर्ष अधिक तीव्र करत आहे. असाद राजवटीमध्ये अलवायट पंथीयांची सरकारी नोकर्‍यांमध्ये मोक्याच्या ठिकाणी वर्णी लागली होती. त्यांचे राजकीय प्राबल्यही जादा होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news