जपानच्या शास्त्रज्ञांनी दिला महाभूकंपाचा इशारा

8 ते 9 रिश्टरचा हादरा शक्य : पंतप्रधान दौरा सोडून मायदेशी
Scientists have warned that Japan is about to be hit by a massive earthquake
जपानच्या शास्त्रज्ञांनी दिला महाभूकंपाचा इशारा.Pudhari File Photo
Published on
Updated on

टोकियो : दोन दिवसांपूर्वी बसलेल्या 7.1 रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर आता जपानमधील शास्त्रज्ञांनी जपानला महाभूकंपाचा धक्का बसणार असल्याचा इशारा दिला आहे. भूगर्भात अत्यंत वेगाने हालचाली होत असून, त्याचाच परिणाम म्हणून महाभूकंप होण्याची शक्यता आहे व तो 8 ते 9 रिश्टर क्षमतेचा असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Scientists have warned that Japan is about to be hit by a massive earthquake
Chile Earthquake | चिलीमध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

जपानला 7.1 आणि 6.9 रिश्टर क्षमतेचे भूकंप हादरे

गुरुवारी जपानला 7.1 आणि 6.9 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाने हादरे दिले होते. यावेळी या भूकंपाने बर्‍यापैकी नुकसानही झाले व 14 जण जखमी झाले. यानंतर आता जपानच्या शास्त्रज्ञांनी महाभूकंपाचा इशारा दिला आहे. जपान हा भूकंपप्रवण असून तेथे भूगर्भात मोठ्या हालचाली सुरू असून त्याचाच परिणाम म्हणून लवकरच 8 ते 9 रिश्टर क्षमतेचा महाभूकंप होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. एवढा मोठा भूकंप शतकातून एखादाच असतो, तरी सावध राहायला हवे. या इशार्‍यानंतर जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा मध्य आशियाचा दौरा अर्धवट टाकून परतले आहेत. पंतप्रधान म्हणून आपत्कालीन स्थितीत आपण हजर असणे महत्त्वाचे असल्याने किमान एक आठवडा, तरी आपण जपानबाहेर जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Scientists have warned that Japan is about to be hit by a massive earthquake
जम्‍मू-काश्मीरच्या बारामुल्‍ला येथे ४.१ रिश्टर स्‍केल तीव्रतेचा भूकंप

महाभूकंपाच्या इशार्‍यानंतर नागरिक सतर्क

महाभूकंपाच्या इशार्‍यानंतर नागरिक सतर्क झाले असून, घबराटीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी खाण्या-पिण्याच्या अत्यावश्यक वस्तूंचा घरात साठा करून घेणे सुरू केले आहे. एएफपीने दिलेल्या बातमीनुसार बुलेट ट्रेनचा वेगही घटवण्यात आला आहे. तसेच जपानमधील सर्वच अणुऊर्जा प्रकल्पांना आपापली सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा बारकाईने तपासून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Scientists have warned that Japan is about to be hit by a massive earthquake
लडाखमधील लेहमध्ये ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

भारतीय दूतावासाच्या गाईडलाईन्स

जपानी शास्त्रज्ञांंच्या या इशार्‍यानंतर जपानमधील भारतीय दूतावासाने जपानमध्ये राहणार्‍या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीसाठी तयार राहावे व आपल्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे कळवण्यात आले आहे. याशिवाय जपान सरकारकडून वेळोवेळी जारी होणार्‍या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यासही सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news