निव्वळ अशक्य! जन्म, मृत्यू पलीकडच्या तिसऱ्या स्थितीचा लागला शोध

जन्म, मृत्यूची सीमा ओलांडणारी स्थिती शोधण्यात संशोधकांना यश
third state beyond life and death
जन्म आणि मृत्यूनंतरही जीवनाची तिसरी स्थिती असल्याचे संशोधकांना म्हटले आहे.File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सजीवांच्या जीवनातील दोन स्थिती म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही स्थिती एकमेकांच्या विरुद्ध आहेत. पण जीवनातील एक तिसरी स्थितीही असते असे सांगितले तर? हे विधान धक्कादायक किंवा आश्चर्चकारक वाटू शकते, पण प्रत्यक्षात संशोधकांना ही तिसरी स्थिती शोधण्यात यश आलेले आहे. जन्म आणि मृत्यूच्या सीमारेषा ओलांडणारी ही तिसरी स्थिती संशोधकांनी एका रिसर्च पेपरमधून सादर केली आहे.

एखाद्या मृत जीवाच्या पेशींपासून नवीन बहुपेशीय जीवन आकारास येते, असे संशोधन The Conversation या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. जीवशास्त्रज्ञ पीटर नोबल आणि अॅलेक्स पॉजिटकोव यांनी हे संशोधन मांडले आहे.

पेशी स्वतःत बदल करतात?

मृत्यू अपरिवर्तनीय असतो, आणि मृत्यूनंतर जीवाचे कार्य थांबते. पण अवयवदानाचे जर उदाहरण पाहिले तर काही पेशी मृत्यूनंतरही कार्यरत राहतात. यातून असा प्रश्न उपस्थितीत राहतो, तो म्हणजे असे का घडते?

नव्या संशोधनात असे दिसून आले आहे की काही पेशींना जर योग्य परिस्थिती उपलब्ध करून दिली तर ते नव्या जीवनात स्वतःला बदलू शकतात. या पेशींना अन्नघटक, ऑक्सिजन किंवा जैविक वीज दिली तर ते स्वतःला बहुपेशीय स्ट्रक्चरमध्ये बदलू शकते. तसेच या पेशींच्या मूळ कार्यापेक्षा वेगळे काम त्या पार पाडू शकतात.

संशोधकांनी केलेले संशोधन

संशोधकांना एका मृत बेडकाच्या त्वचेतील काही पेशी लॅब डिशमध्ये ठेवल्या होत्या. यातून बहुपेशीय अशा नव्या जीवाची निर्मिती झाली, याला Xenobots असे म्हटले जाते. नव्याने आकाराला आलेले Xenobots पेशीतील Ciliaचा वापर हालचालींसाठी करत होते. पण मूळ बेडकात Cilia चे काम वेगळेच आहे.

संशोधकांनी मानवी फुफ्फुसातील पेशी प्रयोगशाळेत ठेवल्या होत्या, या पेशींना स्वतःला एका हालचाल करणाऱ्या जीवात बदलल्याचे दिसून आले.

मृत्यूनंतर पेशी जिवंत राहतात का?

सजीवाच्या मृत्यूनंतर पेशी जिवंत राहू शकतात का, हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. यात हवामान, चयापचयाचा वेग, संवर्धनासाठी वापरलेले तंत्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत. उदाहरण म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतर पांढऱ्या रक्तपेशी ६० तास जिवंत राहतात. तर मृत्यूनंतर उंदाराच्या सांगाड्यातील पेशी १४ दिवस जिवंत राहू शकतात.

पेशींच्या ज्या पद्धतीने जिवंत राहातात, त्या मागील एकूण क्रिया समजून घेतल्या तर भविष्यातील औषधशास्त्रात क्रांती घडू शकते. या संदर्भातील संशोधन आशादायी असले तरी बऱ्याच गोष्टी अजून रहस्यच आहेत. तरीही मृत्यूनंतरच्या जीवनावर नव्याने प्रकाश टाकण्याचे काम हे संशोधन करू शकणार आहे.

third state beyond life and death
श्रीकृष्णाने मोहिनीचे रूप का घेतले? पांडवांसाठी इरावण बळी का गेला?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news