Visa Ban: सौदी अरेबियाने भारत-पाकिस्तानसह १४ देशांवर घातली व्हिसा बंदी

सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्स यांनी यासाठी घेतला निर्णय
Saudi Arabia to impose visa ban on 14 countries
Visa Ban: सौदी अरेबियाने भारत-पाकिस्तानसह १४ देशांवर घातली व्हिसा बंदी File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान यांनी भारत-पाकिस्‍तानसह जगातील १४ देशांवर तात्पुरत्या स्‍वरूपात व्हिसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी व्यवसाय आणि कुटुंब व्हिसासह, ते उमरा व्हिसावर देखील लागू होईल.

क्राउन प्रिन्स यांनी व्हिसा बंदी का केली?

हजच्या सुरक्षेसाठी सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने भारत आणि पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी घातली आहे. इतर देशांतील लोकांना नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होण्यापासून रोखता यावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला. ही तात्पुरती बंदी जूनच्या मध्यापर्यंत सुरू राहील. हज यात्रा संपल्यानंतर व्हिसावरील बंदी उठवली जाईल.

गेल्‍या वर्षी १००० हून अधिक लोकांचा मृत्‍यू

गेल्या वर्षी हज दरम्यान १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने सौदी अरेबियाच्या क्राउन प्रिन्सने व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये मृतांमध्ये अनधिकृतपणे हजमध्ये सहभागी झालेल्या लोकांचा समावेश होता. अशा परिस्थितीत, सरकार नोंदणी नसलेल्या हज यात्रेकरूंना प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

भारत-पाकिस्‍तानसह या देशांवर सौदीने केला व्हिसा बॅन

सौदी अरेबियाने भारत-पाकिस्‍तानसह ज्‍या १४ देशांना व्हिसा बंदी केली आहे, त्‍यामध्ये बांग्‍लादेश, मिस्‍त्र, इंडोनेशिया, नायजेरिया, इराक, जॉर्डन, अल्‍जेरिया, सुदान, इथियोपिया, ट्यूनेशिया आणि यमन या देशांचा समावेश आहे.

हज यात्रेकरूंच्या सुरक्षेवर फोकस

सौदी अरेबियाच्या परराष्‍ट्र मंत्रालयाने व्हिसा बॅनच्या मागील कारणाविषयी सांगितले की, हा निर्णय हज यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी घेण्यात आला आहे. हज यात्रेमध्ये लोकांना त्रास हाेउ नये, त्‍यांची सुरक्षा चांगली असावी आणि प्रवास आरामदायक असावा या गोष्‍टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news