Saudi Arabia Mecca alert : सौदी अरेबियाने पवित्र मक्का शहरासाठी एका महिन्यात दुसऱ्यांदा दिला आपत्कालीन इशारा

नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच गर्दी करणे किंवा चित्रीकरण करणे टाळण्याचे आवाहन
Saudi Arabia Mecca alert
प्रतिकात्‍मक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

Saudi Arabia Mecca alert : येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, सौदी अरेबियाने आज (दि. २४ सप्‍टेंबर) मक्का शहरासाठी आपत्कालीन इशारा जारी केला. ताज्या तणावाच्या काळात या पवित्र शहराला असलेल्या संभाव्य धोक्याबाबतचा हा पहिलाच इशारा होता. नंतर हा इशारा मागे घेण्यात आला. सौदी नागरी संरक्षण विभागाने (Civil Defence) धोका टळल्याचे जाहीर केले. तसेच नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच गर्दी करणे किंवा चित्रीकरण करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

हुथींनी डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली

मक्का (सौदी अरेबिया) येथील मस्जिद-अल-हरम (Masjid al-Haram) हे इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र स्थळ मानले जाते. येमेनमधील सौदी-नेतृत्वाखालील आघाडीने म्‍हटलं की, हुथींनी ताइफ आणि यान्बू यांसारख्या भागांवर डागलेली सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे त्यांनी हवेतच नष्ट केली. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Saudi Arabia Mecca alert
Mecca Joint Defence Agreement | सौदी अरेबिया, पाकिस्तान अन् तुर्किये यांच्यात मक्का लष्करी करारावर सही

सौदी प्रशासनाने १५ सप्‍टेंबर रोजी दिला होता इशारा

सौदी प्रशासनाने यापूर्वी १५ सप्टेंबर रोजी मक्का, जेद्दाह आणि ताइफसाठी एक संक्षिप्त इशारा जारी केला होता; मात्र ताज्या तणावाच्या काळात मक्कासाठी दिलेला हा इशारा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. आजच्या हल्ल्यानंतर सौदी-नेतृत्वाखालील आघाडीने म्हटले की, "दहशतवादी हुथी गटाकडून होणारी कोणतीही वाढती आक्रमकता आणि नियमांचे उल्लंघन याला कठोरपणे प्रत्युत्तर दिले जाईल."

Saudi Arabia Mecca alert
Pakistan-Saudi Arabia Agreement | भारताशी युद्ध झाल्यास सौदी अरेबिया मैदानात

हुथींची सौदी अरेबियाविरुद्ध सागरी नाकेबंदी

हुथींनी जुलैमध्ये सौदी अरेबियाविरुद्ध सागरी नाकेबंदी जाहीर केली. यानंतर व्यापक प्रादेशिक संघर्षात आणखी एका आघाडीची भर पडली आहे. हुथींनी येमेनच्या पश्चिम किनारपट्टीचा मोठा भाग आपल्या ताब्यात घेतला असून, त्यामुळे ते मोक्याच्या 'बाब-अल-मंदेब' जलमार्गाच्या अधिक जवळ पोहोचले आहेत. येमेनमधील यादवी युद्धादरम्यान पुन्हा सुरू झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही वाढती आक्रमकता दिसून येत आहे. हा संघर्ष येमेनच्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धाचाच एक भाग आहे; २०२२ मधील युद्धविरामानंतर हा संघर्ष बऱ्याच अंशी थंडावला होता. हुथींनी २०१४ मध्ये राजधानी सनावर ताबा मिळवला होता, त्यानंतर आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारच्या समर्थनार्थ सौदी-नेतृत्वाखालील लष्करी हस्तक्षेप सुरू झाला. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, ताज्या संघर्षामध्ये ७०० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो जण जखमी झाले आहेत. येमेनमध्येच सुमारे १,३०,००० लोक विस्थापित झाले आहेत, तर ३,००० हून अधिक लोकांनी बोटीद्वारे लाल समुद्र ओलांडून आफ्रिकेत आश्रय घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news