49 people die in Sahara desert | भयंकर! सहारा वाळवंटात पाणी - पाणी करत 49 लोकांचा तडफडून मृत्‍यू : मृत नायजर देशातील प्रवासी!

निर्जन ठिकाणी ट्रक बंद पडल्याने पाण्याअभावी तहानेने गेले जीव, नायजर व अल्जेरिया देशांच्या सिमेवरील घटना, दोन जणांनी 50 किलोमिटर चालत गाठले असाकामा शहर, सर्वांचे केले सामुदायिक दफन
49 people die in Sahara desert
49 people die in Sahara desert
Published on
Updated on

Sahara desert thirst death सहारा वाळवंटातील असाकामा शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर ट्रक बंद पडला. या ट्रकमध्ये काही लोक होते हा ट्रक प्रयत्‍न करुनही दुरुस्त झाला नाही. त्‍यात वाळवंट कुठेही पाण्याचा लवलेश नाही, प्रचंड तापमान यामुळे तडफडून 49 लोक मरण पावले. ही घटना आफ्रिकेतील नायजर या देशात घडली आहे. यातील 2 प्रवाशांनी ५० किलोमीटरपेक्षा वाळवंट पायी पार करत आसाकामा गाठले व आपला जीव वाचवला. या दोघांनी प्रशासनाला ही माहिती दिली. त्‍यानंतर ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये सर्व नागरिक नायजर देशाचे रहिवासी होते.

आसामका हे नायजर आणि अल्जेरिया यांच्यातील एक मुख्य सीमा ओलांडण्याचे ठिकाण आहे, तसेच ते मालीच्या देशाच्यास सीमेजवळही आहे. याठिकाणी ही घटना घडली. अगाडेझ प्रदेशाचे गव्हर्नर जनरल इब्रा बौलामा इस्सा यांनी घटनास्थळी पाठवलेल्या एका शिष्टमंडळाला असे समजले की, हा ट्रक नायजरच्या सीमेपासून सुमारे ३०० किमी अंतरावर असलेल्या मालीमधील 'तालहंदेक' (Talhandek) या शहरातून अनेक दिवसांपासून प्रवास करत होता.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हे सर्व प्रवासी माली (Mali) देशात एका धार्मिक उत्सवात सहभागी होऊन ट्रकमधून आपल्या मायदेशी म्हणजेच नायजरला परतत होते. मात्र, नायजर आणि अल्जेरिया देशांच्या सीमेजवळ असलेल्या 'अस्सामाका' शहरापासून सुमारे ८० किलोमीटर दूर, एका अत्यंत दुर्गम आणि निर्जन भागात त्यांचा ट्रक अचानक नादुरुस्त झाला.

दुरुस्तीचे प्रयत्न अपयशी, पाण्याचा साठा संपला

ट्रक थांबल्यानंतर चालक, त्याचे मदतनीस आणि प्रवाशांनी रणरणत्या उन्हात गाडी दुरुस्त करण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. सहारा वाळवंटातील अंगाची लाहीलाही करणाऱ्या अत्यंत उष्ण हवामानामुळे प्रवाशांकडे असलेला पिण्याच्या पाण्याचा साठा काही वेळातच पूर्णपणे संपला. सभोवताली लांबच लांब केवळ तापलेली वाळू आणि मदतीची कोणतीही सोय नसल्याने, तहान आणि उष्णतेच्या तीव्रतेमुळे ४९ जणांनी ट्रकच्या खाली व आजूबाजूलाच जीव सोडला.

जीवाची पर्वा न करता ५० किमी पायपीट; २ जण बचावले

या भीषण काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेतून केवळ दोन प्रवासी सुदैवाने जिवंत वाचले आहेत. त्यांनी या अत्यंत कठीण परिस्थितीत वाळवंटातील कडक उन्हात तब्बल ५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी कापले. वाटेत एका पाण्याच्या स्रोतामुळे त्यांचा जीव वाचला आणि पुढे असाकमा शहरात पोहोचून त्यांनी प्रशासनाला या दुर्घटनेची माहिती दिली.

प्रशासनाच्या माहितीनुसार घटनास्थळावरील दृश्य अत्यंत अस्वस्थ करणारे होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेल्या सर्व दुर्दैवी प्रवाशांचे मृतदेह त्याच वाळवंटात सामूहिक दफन करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news