

आफ्रिकेत एक असा नाभिक आहे जो आपल्या अनोख्या शैलिने केशकर्तन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची केस कापण्यासाठी वापरणारी हत्यारे अनेकांना अचंबित करणारी असतात. अधून मधून सोशल मिडीयावर या नाभिकाची चर्चा होत असते. तो नेहमी व्हायरलही होत असतो.
केनियातील Kiambu कियांबू या शहरात आपल्या छोट्या झोपडीवजा दुकानात सफारी मार्टीन नावाचा नाभिक लोकांचे केस कापत असतो. पण नाभिकाची केस कापण्याची पद्धत एकदम अनोखी आहे. साधारण पणे कात्री, कंगवा, वस्तरा अशी हत्यारे सर्वसाधारण दुकानात आपण केस कापताना वापरली जातात. पण मार्टीन यांची गोष्टच न्यारी आहे
थेट फावड्याने, बागकामातील कात्रीने केस कटींग
मार्टीन आपल्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांचे केस धारधार फावडे, बागकाम करणाऱ्या कात्रीने कापतात काहीवेळा उकरण्यासाठी वापरले जाणारे बेलन हे हत्यारही ते वापरतात. आफ्रिकेत अनेक लोकांचे केस हे कुरळे व दाट असतात अशावेळी हे केस संटिंग करण्यासाठी मार्टीन आपल्या कपडे इस्त्री करण्यासाठी वापरणारी आर्यन वापरतात. सर्वसाधारण ही हत्यारे आपण बागकाम किंवा शेतीकाम करताना पाहतो. पण मार्टीन यांनी आपल्या नाभिक व्यवसायात ही हत्यारे वापरुन सोशल मिडीयावर जागा केली आहे.
टिक टॉक, इन्स्टाग्राम स्टार चिफ SAFRO : 10 लाख फोलोअर्स
या त्यांच्या अनोख्या केस कापण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. आता विशेषतः टिकटॉकवर खूप बोलबाला आहे. इन्स्टग्राम व टिकटॉकवर दोनीकडे मिळून त्यांचे 10 लाखांवर फोलोअर्स आहेत. सफारी मार्टीन नाव असले तरी ते चिफ SAFRO या नावाने प्रसिद्ध आहेत. हायस्कूल संपल्यानंतर ते आपल्या परंपरागत व्यवसायात पडले. पण अपेक्षित यश मिळाले नाही मग त्यांनी कात्री, वस्तरा अशी परंपरागत हत्यारे सोडून बागकामांच्या हत्यारांनी केस कापण्यास सुरवात केली. 2023 मध्ये त्यांनी टिक टॉकवर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरवात केली. नंतर इन्स्टावर मग हळू हळू या अनोख्या केसेकर्तनालयाचे व्हीडीओ व्हायरल होऊ लागले. हळू हळू फॉलोअर्सची संख्या वाढून ती 10 लाखांवर गेली आहे.
आफ्रिकन कथांचा सन्मान:पण बोलून दाखविली खंत
सफारी यांनी याबद्दल बोलताना आपल्या आफ्रिकन केनीयन परंपरेचा आपल्याला अभिमना असल्याचे सांगतात. व्हिडीओमधून मी आफ्रिकन कथांना जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. असे मार्टीन म्हणतात पण सध्या या सोशल मिडीयावर पण भेदभाव आल्याचे चे सांगतात. त्यांच्या मते ठरलेले पेमेंट वेळेत मिळत नाही. कंपन्या व्हिडीओ तर मागवून घेतात, views व लाइक्स असतात पण पैसे देताना टाळाटाळ करतात. बार्बर कंटेन क्रिएटरना सन्मान मिळत नाही अशी खंतही बोलून दाखवली. समाजात जसा नाभिकांना मान मिळत नाही तसाच प्रकार आता सोशल मिडीयावर ही होतो बार्बर कंटेन्ड क्रिएटरना मान दिला जात नाही.
1500 शिलींग केस कापण्याचा दर
मार्टीन हे केस कापण्यासाठी 1500 केनियन सिंलींग घेतात. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 1000 रुपयांपर्यंत जाते. मार्टीन यांना मिळालेली प्रसिद्धी व बोलबाला पाहून तसेच व्हीडिओत दिसावे यासाठी अनेक केनियन तरुण त्यांच्याकडून केस कापून घेण्यासाठी येत असतात.