Russia Ukrain : स्फोटात पाय गमावलेल्या युक्रेनियन नर्सचा विवाह

Russia Ukrain : स्फोटात पाय गमावलेल्या युक्रेनियन नर्सचा विवाह
Published on
Updated on

लीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यानचा हिंसाचार आणि अत्याचाराचे अनेक व्हिडीओ समोर आलेले आहेत. या विपरीत काळात माणुसकी अद्याप जिवंत असल्याचेही दिसून आले. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. युक्रेनच्या लीव्ह शहरातील एका नवपरिणित जोडप्याच्या नृत्याचा हा व्हिडीओ आहे. स्फोटामध्ये दोन्ही पाय गमावलेल्या एका नर्सशी विवाह केलेल्या तरुणाने तिला उचलून धरले आहे आणि तो तिच्यासमवेत नृत्य करीत आहे, असे या व्हिडीओमधून दिसते. लीव्ह मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ ओक्साना नावाच्या नर्सचा आहे. तिने दोन्ही पाय गमावल्यावरही तिच्या व्हिक्टर नावाच्या प्रियकराने तिची साथ सोडली नाही, उलट तिच्याशी लग्न करून आपल्या नात्याला नाव दिले!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news