पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियन सैन्याने आज (दि.२६) पहाटेपासून युकेनच्या ड्रोन हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. पहाटेपासून युक्रेनवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला करत देशातील पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात असून, या हल्ल्यात तीन जण ठार झाल्याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. दरम्यान, या हल्ल्यात तीन जण ठार झाले आहे. रशियाचा युक्रेनवर काही आठवड्यांतील हा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे.
युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील पूर्व, उत्तर, दक्षिण आणि मध्य प्रदेशात रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हवरही हल्ले होत असून शहरातील काही भागातील वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला आहे, अशी माहिती कीव्हचे महापौर विटाली क्लीत्स्को यांनी माध्यमांना दिली.एक बहुमजली निवासी इमारतीवरील ड्रोन हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. तर मध्य निप्रॉपेट्रोव्स्क आणि झापोरिझ्झि प्रदेशात दोघांचा मृत्यू झाला. युक्रेनच्या खाजगी ऊर्जा कंपनी 'डीटीईके'ने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “देशभरातील ऊर्जा कर्मचारी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
शियातील सेराटोव्ह येथे युक्रेनने अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेंड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला केला. सेराटोव्हमधील ३८ मजली निवासी इमारतीला आज (दि. २६) सकाळी ड्रोन धडकले. या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हे ड्रोन हल्ले युक्रेनने केल्याचा दावा मॉस्कोच्या गव्हर्नर करत आहेत. यावर युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्टनुसार, युक्रेनच्या लष्कराने रशियातील सेराटोव्ह येथील सर्वात उंच इमारतीला लक्ष्य केले. एंगेल्समध्ये रशियाचा लष्करी तळ आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनने अनेकवेळा त्यावर हल्ले केले आहेत.या हल्ल्यात इमारतीच्या मोठ्या भागाचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात इमारतीखाली उभ्या असलेल्या 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.