Russia Kyiv Airstrike | रशियाचा कीव्हवर हवाई हल्ला; २० ठार

Russia Ukraine War |
Russia Kyiv Airstrike | रशियाचा कीव्हवर हवाई हल्ला; २० ठार
Published on
Updated on

कीव्ह; वृत्तसंस्था : रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनची राजधानी कीव्हवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात किमान २० नागरिकांचा मृत्यू झाला, तर ९० हून अधिक जण जखमी झाले. मृत आणि जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कीव्हचे महापौर विताली क्लिट्स्को यांनी हा राजधानीवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगितले. हल्ल्यात रुग्णवाहिका केंद्रासह अनेक निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले असून शुक्रवारी शहरात शोक पाळण्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लोदोमीर झेलेन्स्की यांनी पाश्चात्त्य मित्रदेशांना युक्रेनला अधिक हवाई संरक्षण प्रणाली उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.

७४ क्षेपणास्त्रे, ४९६ ड्रोनचा वापर

रशियाने एका रात्रीत ७४ क्षेपणास्त्रे आणि ४९६ ड्रोन डागले. त्यापैकी २५ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि १२ ड्रोन राजधानीसह ३३ ठिकाणी आदळले. रशियाने रात्री उशिरापासून सलग सुमारे ११ तास विविध टप्प्यांत हल्ले केले. सुरुवातीला ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला, त्यानंतर बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. पहाटेपर्यंत ड्रोनची नवी लाट राजधानीवर कोसळत राहिली. या हल्ल्यामुळे शहरातील अनेक भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news