युक्रेनचा अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्‍ला

रशियाचा आरोप, परिसरातील सुरक्षा धोक्‍यात आल्‍याचा दावा
Russia- Ukraine War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पाजवळ युक्रेनने ड्रोन हल्‍ला केल्‍याचा दावा रशियाने केला असल्‍याचे वृत्त रशियन वृत्तसंस्‍था 'TASS'ने दिले आहे.

झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्प हा युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प म्‍हणून ओळखला जातो. युक्रेनमध्‍ये असणार्‍या झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचे नियंत्रण आहे. मॉस्को आणि कीव यांनी एकमेकांवर वारंवार आरोप केल्यामुळे हा प्लांट निष्क्रिय आहे. युक्रेने वारंवार हल्‍ले करुन अणुऊर्जा प्रकल्पाच्‍या आसपासची सुरक्षा धोक्यात आणत असल्‍याचे रशियाने म्‍हटले आहे.

युक्रेनने 6 ऑगस्टपासून कुर्स्क प्रदेशातील 1,150 चौरस किलोमीटर (444 चौरस मैल) क्षेत्रावरील 82 वसाहतींवर ताबा मिळवल्याचा दावा करत रशियाच्‍या प्रदेशात शिरकाव केला आहे. रशियाच्या आरआयए वृत्तसंस्थेने व्हिएन्नामधील कार्यवाहक रशियन प्रतिनिधी, रोमन उस्तिनोव्ह यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, रशियाला झापोरिझ्झियाअणुऊर्जा प्रकल्पजवळ झालेल्‍या ड्राेन हल्ल्याबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या नेतृत्वाशी चर्चा करायची आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news