पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युरोपियन महासंघाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत; पण यांचा लवकर मृत्यू होईल. यानंतर रशिया-युक्रेन युद्ध संपुष्टात येईल, असा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी केला. फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनसोबत बुधवारी (दि.२६) झालेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून पुतिन यांच्या आरोग्यावर तर्कवितर्क लढवले जात आहे. आता झेलेन्स्की यांनी त्यांच्या मृत्यूचेच भाकित केल्याने सर्वांचे लक्ष रशियाकडून होणार्या खुलाशाकडे लागले आहे. ( Russia-Ukraine war)
पुतिन यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला आहे. त्यांना खोकल्याचा त्रास होत आहे. तसेच त्यांना गंभीर आजार झाल्याचे दावा केला जात आहे. मात्र या सर्व अफवा असल्याचे क्रेमलिनने स्पष्ट केले आहे. ( Russia-Ukraine war)
माध्यमांशी बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, आम्ही केलेल्या शांतीच्या प्रयत्नांनंतरही रशियाने युद्ध सुरु ठेवले आहे. रशिया हे युद्ध सुरू ठेवू इच्छित आहे. ते लांबवत आहे. आपल्याला त्यांच्यावर दबाव आणावा लागेल. यानंतर युद्ध खरोखरच संपेल. अमेरिकी मध्यस्थीनंतर गेल्या आठवड्यात केलेल्या युद्धविरामानंतरही ड्रोन हल्ले सुरूच आहेत. या आठवड्यात रशियाने युक्रेनवर 117 ड्रोन हल्ले केले आहेत. दुसरीकडे, रशियाने दावा केला की, "युक्रेनने कुर्स्क व ब्रायांस्क प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, नऊ युक्रेनियन ड्रोन नष्ट करण्यात आले आहेत."