व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्‍ड ट्रम्‍प, नरेंद्र माेदी यांच्यासह वैश्विक नेत्‍यांचे मानले आभार

Russia Ukraine War | युक्रेनबरोबरच्या युद्धबंदी प्रस्‍तावासाठी रशिया सकारात्‍मक पण ठेवल्‍या या अटी ?
Vladimir Putin
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

रशिया युक्रेन यांच्यात गेल्‍या दोन वर्षांपासून सुरु असलेले युद्ध थांबावे यासाठी प्रयत्‍न केलेल्‍या नेत्‍यांचे रशियाचे अध्यक्ष ब्‍लादिमार पुतीन यांनी आभार मानले आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्‍प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चिनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्‍वा यांचा समावेश आहे.

गुरुवारी बेलारुसचे राष्‍ट्रपती अलेक्‍झांडर लुकाशेंको यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्‍हणाले रशिया दुश्मनी संपवण्यासाठी सहमत आहे. पण स्‍थायीस्‍वरुपात शांती आली पाहिजे आणि हे जे आलेले संकट होते त्‍याच्या मुळ कारणांचे समाधान झाले पाहिजे.

पुढे ते म्‍हणाले ‘युक्रेन बरोबरच्यसा समझोत्‍यासाठी विशेष लक्ष दिल्‍याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांचे आभार, सर्वच देशांचे प्रमुख त्‍यांच्या देशांतर्गत समस्‍या सोडवण्यासाठी प्रयत्‍नशिल असतात पण त्‍याचबरोबर भारत, चिन, ब्राझील व दक्षिण आफ्रिकेच्या राष्‍ट्रपतींनी आमच्यासाठी खूप वेळ दिला व रशिया - युक्रेनमधील वाद संपुष्‍टात यावे यासाठी प्रयत्‍न केले. मी या सर्व प्रमुखांचा आभारी आहे. या सर्वांचा उद्देश युद्धामुळे निर्माण होणारी शत्रूता व जिवीत-वित्त हानी समाप्त करणे हा होता.

या ठेवल्‍या अटी

पुतीन यांनी पुढे म्‍हटले की युक्रेन बरोबर सुरु असलेल्‍या युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेच्या प्रस्‍तावाला आमची सहमती आहे. पण युत्रविरामानंतर कायमस्‍वरुपी शांती आली पाहिजे, त्‍याचबरोबर या संघर्षाचे मुळ कारण काय हे शोधले पाहिजे, इत्‍यादी अटी घातल्‍या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news