US protests against Trump | ट्रम्पविरोधात अमेरिकेत उद्रेक

‘नो किंग्स रॅली’मध्ये 50 राज्यांतील 80 लाख लोक रस्त्यावर
US protests against Trump |
US protests against Trump | ट्रम्पविरोधात अमेरिकेत उद्रेक
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराणसोबत सुरू केलेल्या युद्धामुळे गगनाला पोहोचलेली महागाई, डॉलरला बसत चाललेला फटका आणि श्रीमंतांचा वाढत चाललेला प्रभाव यामुळे अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात सामान्य जनतेचा उद्रेक पाहायला मिळाला. यादरम्यान झालेल्या ‘नो किंग्स रॅली’मध्ये सुमारे 80 लाख लोकांनी भाग घेतला. अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 पेक्षा जास्त ठिकाणी करण्यात आलेल्या उग्र आंदोलामुळे ट्रम्प सरकारवरील दबाव वाढला आहे.

सध्या ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तेथील सर्वच 50 राज्यांमध्ये शनिवारी लाखो लोक रस्त्यावर उतरले. तिथे ‘नो किंग्स’ म्हणजेच कोणीही राजा नाही या नावाचे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण अमेरिकेत वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन करण्यात आले. याच आंदोलनाच्या माध्यमातून ट्रम्प यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नो किंग्स आंदोलनात याआधी दोन वेळा रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वी जून 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत सुमारे 50 लाख लोकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये आयोजित अशाच रॅलीत 70 लाख लोक सहभागी झाले होते. यावेळच्या तिसर्‍या नो किंग्ज आंदोलनात 80 लाख लोक सहभागी झाले होते.

हे सगळे अमेरिकेला मजबूत करण्यासाठी : ट्रम्प यांची भूमिका

दरम्यान, या आंदोलनावर ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, त्यांचे निर्णय देशाला मजबूत करण्यासाठी आहेत. मी कधीही स्वतःला राजा म्हटलेले नाही. त्यामुळे माझ्यावर लावलेले सगळे आरोप चुकीचे आहेत.

...म्हणून ट्रम्पविरोधात संताप

आंदोलकांचे म्हणणे आहे की, ते ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर नाराज आहेत. विशेषतः इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन कारवाई आणि वाढती महागाई यामुळे सामान्य अमेरिकन माणूस वैतागला आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांच्याविरोधात पोस्टर्स दाखवून दोघांनाही पदावरून हटवण्याची जोरदार मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news