Middle East War News | युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव

लोकप्रतिनिधीगृहात पक्षावरील पकड सैल
Donald Trump |
Middle East War News | युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांच्यावर दबाव
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू ठेवण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची (संसद) मंजुरी घ्यावी किंवा आपले सैन्य मागे घ्यावे, या मागणीच्या प्रस्तावाला ट्रम्प यांच्या पक्षाचे बहुमत असणाऱ्या प्रतिनिधीगृहात मंजुरी देण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या इराणविरुद्धच्या युद्ध धोरणाला हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

ट्रम्प यांच्या पक्षातील खासदारांचेच बंड; प्रस्तावाच्या बाजूने २१५ मते

बुधवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या मतदानात या प्रस्तावाच्या बाजूने २१५, तर विरोधात २०८ मते पडली. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्याच चार खासदारांनी पक्षादेश झुगारून विरोधक असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या खासदारांसोबत जात प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. थॉमस मॅसी (केन्टकी), ब्रायन फिट्झपॅट्रिक (पेनसिल्व्हेनिया), वॉरेन डेव्हिडसन (ओहायो) आणि टॉम बॅरेट (मिशिगन) अशी या बंडखोर रिपब्लिकन खासदारांची नावे आहेत.

प्रस्तावाचे कायदेशीर महत्त्व आणि पुढील दिशा

हा प्रस्ताव आता सिनेटमध्ये (वरिष्ठ सभागृह) मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. हा एक ‘संयुक्त प्रस्ताव’ (Concurrent Resolution) असल्याने यावर राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीची गरज नाही. त्यामुळे हा कायदा म्हणून लागू होणार की नाही, याबाबत कायदेशीर संभ्रम असला, तरी ट्रम्प यांच्या आक्रमक धोरणांना लगाम घालण्यासाठी हा एक मोठा राजकीय संदेश मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news