‘खलिस्तानी’ प्रतिष्ठानकडून पॉपस्टार रेहानाला 18 कोटी

Published on
Updated on

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

शेतकरी आंदोलनावरून भारताच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करणार्‍या अमेरिकन पॉपस्टार रेहानाची पोलखोल झाली आहे. खलिस्तान समर्थकांशी संबंधित असलेल्या एका 'पीआर' प्रतिष्ठानने रेहानाला ट्विटरवर पोस्ट टाकण्याच्या मोबदल्यात 18 कोटी रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे. (Pop star was paid over Rs.18 crores in dollars by PR firm with Khalistani links to tweet in support of farmer protests)

अधिक वाचा : राज्यातील तीन पायांचे सरकार केव्हाही उलथवू : फडणवीस

'द प्रिंट'च्या वृत्तानुसार स्काय रॉकेट नावाच्या एका पीआर प्रतिष्ठानने रेहानाला शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्याकरिता पोस्ट टाकण्यासाठी 2.5 दशलक्ष डॉलर (18 कोटी रुपये) दिले. स्वीडनमधील पर्यावरणवादी युवती ग्रेटा थनबर्गपर्यंतही ही पोस्ट जाणीवपूर्वक पोहोचविण्यात आली होती. धालीवाल हा खालिस्तानी समर्थक या फर्मचा एक संचालक आहे. धालीवाल हा स्वत:ला जाहीरपणे खलिस्तानी म्हणवून घेतो.

अधिक वाचा : खुल्या नाट्यगृहात एप्रिलपासून घंटा वाजणार!

रेहानाच्या मालकीच्या फँटी ब्युटी या कंपनीच्या एका उत्पादनावरूनही रेहाना वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या उत्पादनासाठीचा कच्चा माल (मीका 4) भारतातून पुरवला जातो आणि हा कच्चा माल मिळविण्यासाठी भारतातील गरीब शेतकर्‍यांची मुले खदाणींमध्ये मजुरी करतात. रेहाना ही बाब लपविते. कारण ज्या उत्पादनात बालमजूर वापरले जातात, त्यांना कॅलिफोर्नियात परवानगी नसते.  

अधिक वाचा : कोरोनामुळे यूपीएससीच्या परिक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

रेहानाचे पाकिस्तानी कनेक्शन

पाकिस्तानातील भारतविरोधी कट्टरपंथी संघटनांनी काही महिन्यांपूर्वी तयार केलेला मजकूरही रेहानाने समाजमाध्यमांतून व्हायरल केला आहे. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे सहकारी केंद्रीय मंत्री झुल्फी बुखारी यांच्याशी रेहानाचे संबंध असल्याचे दर्शविणारे एक छायाचित्रही समाजमाध्यमांतून व्हायरल होत आहे. 'आता कळले, शेतकर्‍यांचा इतका पुळका का आला ते', अशा स्वरूपाच्या अनेक प्रतिक्रिया त्यावर भारतातून व्यक्त होत आहेत.

रेहानाचे 11 कोटी फॉलोअर्स

रेहानाचे जगभरात 11 कोटी ट्विटर फॉलोअर्स आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी तिने ट्विट केलेल्या पोस्टला जगभरातील 2.20 लाख लोकांनी री-ट्विट केले होते, हे येथे उल्लेखनीय!


 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news