मेहुल चोक्सीसाठी अहवाल दिलेला नाही : सेबी 

अँटिगुवा : पुढारी ऑनलाईन 

अँटिगुवाच्या नागरिकत्व फरार उद्योगपती मेहुल चौक्सीसाठी कोणताही सकारात्मक अहवाल दिला नसल्याचे सिक्युरिटीज अॅण्ड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) स्पष्ट करण्यात आले. सेबीने अशा प्रकारची कोणतीही विनंती स्वीकारलेली नाही तसेच अँटिगुवा प्रशासनाला माहिती दिली नसल्याचे सेबीने स्पष्ट केले. 

दरम्यान, भारतातील मोठ्या बँक घोटाळ्यापैकी एक पीएनबी बँक घोटाळा करुन पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चौक्सी याला अँटिगुवा देशाचे नागरिकत्व कसे मिळाले यावरुन वादंग सुरु आहे. या प्रकरणी अँटिगुवा मधील विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. अँटिगुवा सरकारच्या म्हणण्यानुसार भारतातील पोलिसांकडून कोणतीही हरकत नसल्याचे क्लिअरन्स पत्र आल्यावरच मेहुल चौक्सीला नागरिकत्व दिले आहे. 

करबुडवे आणि आर्थिक घोटाळे करुन पळून जाणाऱ्यांसाठी स्वर्ग समजल्या जाणारा देश म्हणून अँटिगुवा- बर्बुडा देशाची ओळख आहे. भारताचा या देशाशी प्रत्यार्पण करार न झाल्याने पीएनबी बँकेला १३ हजार कोटींचा चूना लावून पळून गेलेल्या चौक्सीला परत आणण्यात अडचणी येत आहेत. सध्या अँटिगुवा देशाचे नागरिकत्व चौक्सीला मिळालेच कसे याच्यावरुन दोन्ही देशात वादंग सुरु आहे. 

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news