

पुढारी ऑनलाईन डेस्क
अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती टेस्ला कंपनीचे सिईओ इलॉन मस्क यांनी भेट घेतली. या भेटीसाठी मस्क हे सहकुंटूंब आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर त्यांची तीन लहान मुले होती. त्यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली. अमेरिकेची राजधानी वॉश्गिंटन डीसी मधील ब्लेअर हाऊस येथे ही बैठक पार पडली.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वॉल्टझ यांच्यात बैठक झाली. या बैठकीवेळी भारताचे विदेशमंत्री डॉ. एस. जयशंकर व भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे उपस्थित होते.