Russia Pakistan Rail Corridor | रशिया-पाकिस्तान नियोजित रेल्वे कॉरिडॉरमुळे भारताची चिंता वाढणार

सेंट पीटसबर्ग ते चाबहारपर्यंत हिंद महासागराला जोडणारा नवा व्यापारी मार्ग
Russia Pakistan Rail Corridor |
Russia Pakistan Rail Corridor | रशिया-पाकिस्तान नियोजित रेल्वे कॉरिडॉरमुळे भारताची चिंता वाढणार
Published on
Updated on

मॉस्को; वृत्तसंस्‍था : रशिया लवकरच पाकिस्तानपर्यंत थेट रेल्वे मार्ग तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. ‘रशिया-मध्य आशिया-हिंद महासागर’ असे या बहुचर्चित रेल्वे कॉरिडॉरचे नाव असेल.

सेंट पीटसबर्ग ते चाबहार हा रेल्वे मार्ग रशियाला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या माध्यमातून थेट हिंद महासागराशी जोडेल. या प्रकल्पामुळे रशिया आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक दृढ होणार असून, भारतासाठी ही डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतासोबतच्या मैत्रीमुळे रशियाने आतापर्यंत पाकिस्तानपासून काहीसे अंतर ठेवले होते. मात्र, बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये दोन्ही देशांतील व्यापारी व राजनैतिक संबंध वेगाने सुधारत आहेत. पाकिस्तानने रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली असून, थेट सागरी व्यापारातही वाढ झाली आहे.

प्रकल्पाला गती; उपपंतप्रधानांची पुष्टी

रशियाचे उपपंतप्रधान मारात खुसनुलिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशिया, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे देश अफगाणिस्तान-पाकिस्तानमार्गे हिंद महासागरापर्यंत रेल्वे जाळे विस्तारण्यावर गांभीर्याने विचार करत आहेत. रशियाचे वाहतूक मंत्रालय हा प्रकल्प वेगाने पुढे नेत आहे. तथापि, हा मार्ग अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील आणि अशांत भागातून जाणार असल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news