Boeing job cuts | जगातील 'या' सर्वात मोठ्या विमान कंपनीचा १७ हजार कर्मचाऱ्यांना नारळ

कंपनीच्या CEO सांगितले नोकरकपातीचे कारण
Boeing job cuts
जगातील सर्वात मोठी विमान उत्पादक कंपनी बोईंग सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. (file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी विमान उत्पादक कंपनी बोईंग सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यामुळे बोईंग कंपनी तब्बल १७ हजार नोकरकपात (Boeing job cuts) करणार आहे. यामुळे त्यांना 777X जेटची पहिली डिलिव्हरी देण्यास एका वर्षाचा विलंब होण्याची शक्यता आहे. बोईंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या महिनाभर चाललेल्या संपामुळे कंपनीच्या विमान उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. परिणामी कंपनीला तिसऱ्या तिमाहीत ५ अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागला आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

बोईंगचे सीईओ केली ऑर्टबर्ग (Kelly Ortberg) यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, ३३ हजार यूएस वेस्ट कोस्ट कर्मचारी संपावर गेल्याने कंपनीने 737 MAX, 767 आणि 777 जेट्सचे उत्पादन बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी कर्मचारी कपात करावी लागेल.

"येत्या काही महिन्यांत, आम्ही आमच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करत आहोत. या नोकरकपातीत अधिकारी, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचा समावेश असेल.," असे ऑर्टबर्ग यांनी म्हटले आहे. दरम्यान, कंपनीचे शेअर्सचे १.७ टक्क्यांनी घसरले आहेत.

Boeing machinists strike : प्रकरण काय?

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सुमारे ३३ हजार कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बोईंग कंपनीला मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या विमान उत्पादनाला फटका बसला आहे. गेल्या १४ सप्टेंबरपासून त्यांचे सुमारे ३३ हजार मशिनिस्ट संपावर आहेत. दरम्यान, संप मागे घेण्याबाबत कंपनी आणि संघटनेच्या चर्चेतून कोणताही तोडगा निघालेला नाही. गेल्या महिन्यात बोईंगने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मशिनिस्ट्स अँड एयरोस्पेस वर्कस विरोधात राष्ट्रीय कामगार संबंधित मंडळासमोर अर्ज दाखल केला आहे.

Boeing job cuts
Ratan Tata death : 'टेटली ते जग्वार लँड रोव्हर डील करणारा दिग्गज'!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news