Plane emergency landing : रहदारीच्या रस्त्‍यावरच अचानक उतरले विमान, एका पिक-ट्रकला धडक!

फ्लोरिडामध्ये व्यस्त रस्त्यावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; सुदैवाने जीवितहानी नाही, अचानक घडलेल्या घटनेने खळबळ
Plane emergency landing : रहदारीच्या रस्त्‍यावरच अचानक उतरले विमान, एका पिक-ट्रकला धडक
Plane emergency landing : रहदारीच्या रस्त्‍यावरच अचानक उतरले विमान, एका पिक-ट्रकला धडक
Published on: 
Updated on: 

Emergency landing in Florida अमेरिकेत फ्लोरिडामध्ये एका रहदारीच्या रस्त्यावर अचानक एक विमन उतरले व यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाले. रस्त्‍याने चाललेल्या वाहनांच्या मध्येच एक विमानाला एमर्जंन्सी लँडिंग करावी लागली. लँडींग करताना या विमानाची एका पिक ट्रकला धडक बसली.

या बाबत अधिक माहिती अशी की फ्लोरिडामधील नॉर्थ फोर्ट मायर्स येथे शनिवारी एका लहान विमानाचे गर्दीच्या रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. रस्त्यावर उतरताना या विमानाची धडक एका पिकअप ट्रकला बसली. रस्त्यावरून वाहने धावत असताना हे विमान घसरत पुढे जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, या संपूर्ण घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसून सर्वजण सुखरूप बचावल्याची माहिती ली काउंटी शेरीफ कार्यालयाने दिली आहे.

शेरीफ कार्यालयाच्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नॉर्थ फोर्ट मायर्समधील बेकशॉर रोड आणि आय-७५ महामार्गाजवळ घडली. 'सेसना १७२डी स्कायहॉक' या विमानात दोन वैमानिक उपस्थित होते. उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांनी बेकशॉर रोडवर विमान उतरवण्याचा प्रयत्न केला.

रस्त्यावर उतरत असताना विमानाची धडक एका पिकअप ट्रकच्या मागील भागाला बसली. सुदैवाने घटनास्थळी कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. फ्लाईट ट्रॅकिंग डेटामधून समोर आले आहे की या विमानाने फ्लोरिडातील सेब्रिंग येथून शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ११ वाजता उड्डाण केले होते. त्यानंतर अवघ्या ५० मिनिटांत म्हणजेच सकाळी ११:५० वाजता वैमानिकांना हे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.