Government Websites Down | ‘पीएचपी’मधील त्रुटीमुळे जगभरात सरकारी संकेतस्थळे ठप्प

Government Websites Down |
Government Websites Down | ‘पीएचपी’मधील त्रुटीमुळे जगभरात सरकारी संकेतस्थळे ठप्प
Published on: 
Updated on: 

लंडन; वृत्तसंस्था : इंटरनेट जगतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ‘पीएचपी’ या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये दोन दशकांपासून लपलेल्या अत्यंत गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर जगभरात सायबर खळबळ उडाली. संभाव्य सायबर हल्ले आणि डेटा चोरीपासून संरक्षण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटन, नेदरलँडस्‌, फ्रान्स आणि फिनलंडसह युरोपमधील अनेक सरकारी व सार्वजनिक संकेतस्थळे तातडीने ऑफलाईन करण्यात आली आहेत. ही तांत्रिक त्रुटी सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी आधुनिक ‘एआय’ टूल्सच्या मदतीने शोधून काढली. मानवी तपासणीतून ही त्रुटी शोधणे अत्यंत कठीण होते. मात्र हॅकर्स आता एआयचा वापर करून थेट अशा सर्व्हरना लक्ष्य करत आहेत. पीएचपी हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर वर्डप्रेस, ड्रूपल आणि मॅजेंटोसारख्या प्लॅटफॉर्मचा पाया असल्याने जगातील जवळपास ७५% संकेतस्थळांवर याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तातडीने अपडेट करण्याचे आवाहन

पीएचपी डेव्हलपर्सनी या धोक्यावर मात करण्यासाठी तातडीचे सिक्युरिटी पॅचेस (अपडेटस्‌) जारी केले आहेत. सेन्सिसच्या आकडेवारीनुसार लाखो सर्व्हर अजूनही जुन्या आवृत्तीवर चालत असल्याने धोका कायम आहे. विकिपीडिया आणि इंटरनेट आर्काईव्हसारख्या संस्थांनीही आपल्या सिस्टीम्स सुरक्षित करण्यासाठी काही सेवा तात्पुरत्या थांबवल्या आहेत. सायबर सुरक्षा यंत्रणांनी सर्व वेब ॲडमिनिस्ट्रेटर्सना त्यांचे सर्व्हर त्वरित अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

1. एआय टूल्सच्या मदतीने ही अनेक वर्षे जुनी सुरक्षा त्रुटी उघडकीस आली असून हॅकर्सकडून संभाव्य गैरवापराची तीव्र भीती वर्तवली जात आहे.

2. इंटरनेटवरील सुमारे ७५ टक्के वेबसाईटस्‌ पीएचपीवर चालत असल्याने सर्व्हर सुरक्षित करण्यासाठी त्वरित नवीन सुरक्षा पॅच जारी केले.

3. तातडीचा उपाय म्हणून सर्व संकेतस्थळ चालकांना सिस्टीम अपडेट करणे किंवा काम पूर्ण होईपर्यंत साईट बंद ठेवण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news