

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : बांगला देशमध्ये दीपू चंद्र दास या हिंदू व्यक्तीच्या निर्घृण हत्येमुळे जगभरातील हिंदू संघटना, अल्पसंख्याक हक्क गट आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. छळ सोसावा लागणार्या हिंदू अल्पसंख्याकांसाठी काम करणार्या आंतरराष्ट्रीय हिंदू सेवा संघ या मानवधिकार संघटनेने दीपू दास यांच्या हत्येप्रकरणी संयुक्त राष्ट्रात याचिका दाखल केली आहे.
या घटनेमुळे बांगला देशमधील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा आणि न्यायाचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. दास यांची जमावाने हत्या केली. त्यांच्यावर धार्मिक अवमानाचा खोटा आरोप ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी असा आरोप केला आहे की, जमावाने त्यांना बेदम मारहाण करून ठार मारले, त्यानंतर त्यांचा मृतदेह झाडाला लटकवला आणि नंतर पेटवून दिला.
संयुक्तराष्ट्रात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये दोषींना त्वरित अटक करून त्यांच्यावर जलद गतीने खटला चालवावा,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जावीत,असे या याचिकेत म्हटले आहे.
...तर बांगला देशात निवडणुका होऊ देणार नाही : जावेर
इन्कलाब मंचचे सदस्य सचिव अब्दुल्ला अल जावेर यांनी शाहबाग येथील नॅशनल म्युझियमसमोर पत्रकार परिषद घेऊन चेतावणी दिली आहे की, जोपर्यंत शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येचा खटला पूर्ण होत नाही, तोपर्यंत देशात कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही.