वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. मात्र, याचा समुळ नायनाट होत नाही. कारण पाकिस्तानमध्ये सध्या 'हकानी नेटवर्क' आणि 'तालिबान' या दहशतवादी संघटना सुरक्षित आहेत. पाकिस्तान या संघटनांसाठी अद्याप नंदनवनच आहे, अशी बोचरी टीका अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेने अफगाणिस्तान संदर्भात आपली नवी रणनीतीची घोषणा केली होती. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांनावर वचक निर्माण करायचा असेल तर पाकिस्तानने या लढ्यात सहकार्य करावे अन्यथा अमेरिका पाकला देत असलेली आर्थिक रसद रोखेल असाही इशारा देण्यात आला होता. मात्र, गत काही दिवसांमध्ये अफगाणिस्तानमध्ये तसेच पाकिस्तानव व अफगाणिस्तानच्या सीमेवर दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत. यासाठी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या 'हकानी नेटवर्क' आणि 'तालिबान' या दहशतवादी संघटना जबाबदार आहेत, असा थेट आरोप अमेरिकने केला आहे. या संघटनांवर कारवाई झाल्या खेरीज अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवायांवर नियंत्रण येणे अशक्य आहे. मात्र, पाकिस्तान याबाबत अजून गंभीर नसल्याचे दिसून येते, अशी टीकाही करण्यात आली आहे.
Tags : Pakistan, still, paradise, terriorist