इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान भारत सरकारसोबत द्विपक्षीय चर्चा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असतानाच पाकिस्तानच्या टपाल विभागाने कुरघोडी केली आहे. पाकिस्तानच्या टपाल विभागाने काश्मीरमधील अट्टल आणि कुख्यात २० दहशतवाद्यांवर टपाल प्रसिध्द केले आहे.
काश्मीर खोऱ्यातील कुख्यात दहशतवादी बुरहाण वाणीचा २०१६ मध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून खात्मा करण्यात आला होता. तेव्हापासून पाकिस्तानकडून त्याला शहीद म्हणण्याची कुरघोडी केली आहे. ज्या २० दहशतवाद्यांचे टपाल तिकिट प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यांना पाकिस्तानकडून भारतीय लष्कराकडून काश्मीरमधील पीडित असा उल्लेख केला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राला पाकिस्तानी टपाल विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्या दहशतवाद्यांची टपाल तिकिटे कराचीमधून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कराचीमध्ये पाकिस्तानी डाक विभागाचे मुख्यालय आहे. काश्मीरमधील लोकांसोबत पाकिस्तान आहे असे दाखविण्यासाठीच हा उद्योग केला जात आहे.
पाकिस्तान टपाल विभागाने हा उद्योग ऐवढ्यावरच न थांबता काश्मीरमधील कुख्यात दहशतवाद्यांना पीडित, शहीद अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. भारतीय लष्कराकडून खात्मा करण्यात आलेल्या बुरहाण वाणी या कुख्यात दहशतवाद्याला फ्रिडम आयकॉनची उपाधी दिली आहे. रासायनिक अस्त्रांचा वापर, पॅलेट गनचा वापर अशा शब्दांचा वापर सुद्धा पाकिस्तानच्या टपाल विभागाकडून करण्यात आला आहे.