पाकिस्‍तानमध्ये LPG टँकरचा भीषण स्‍फोट; ६ जण ठार; ३१ जण जखमी

जवळपासची सुमारे २० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली
pakistan lpg gas tanker blast six died and 31 people were injured
पाकिस्‍तानमध्ये LPG टँकरचा भीषण स्‍फोट; ६ जण ठार; ३१ जण जखमीFile Photo
Published on
Updated on

लाहौर : पुढारी ऑनलाईन

पाकिस्‍तानच्या पंजाब प्रांतात LPG ने भरलेल्‍या टँकरचा स्‍फोट झाला. यामध्ये अल्पवयीन मुलगीसह सहा लोकांचा मृत्‍यू झाला. अधिकाऱ्यांनी आज या विषयी माहिती दिली. यामध्ये एकुण ३१ जण जखमी झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुल्‍तानच्या हमीदपूर कनौरा परिसरातील औद्योगिक क्षेत्रात हा भीषण स्‍फोट झाला.

जियो न्यूजच्या माहितीनुसार, आज (सोमवार) टँकरमध्ये स्‍फोटाची घटना घडली. या स्‍फोटानंतर या टँकरमध्ये आग लागली. या स्‍फोटानंतर या वाहनाचे स्‍फोटानंतरचे तुकडे परिसरात लांबपर्यंत विखुरल्‍या स्‍वरूपात पडले होते. यानंतर तात्‍काळ अग्‍निशमनच्या १० गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍या. अनेक तासांच्या प्रयत्‍नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

सुरूवातील पाच लोकांचा मृत्‍यू झाल्‍याची माहिती समोर आली होती. मात्र या नंतर एका घरातून एक मृतदेह मिळाला आहे. त्‍यामुळे आता या घटनेत एकुण ६ जण ठार झाल्‍याचे समोर आले आहे. मृतांमध्ये एक अल्‍पवयीन आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या परिसरातील आसपासची २० घरे या स्‍फोटामुळे पूर्णपणे नष्‍ट झाली आहेत. तर ७० घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news