

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे सध्याचे चार प्रांत 12 भागांमध्ये विभागण्याची तयारी सुरू आहे. देशात लहान-लहान प्रांत निर्माण होणे आता निश्चित आहे, असे देशाचे दळणवळणमंत्री अब्दुल अलीम खान यांनी म्हटले आहे. यामुळे शासन अधिक चांगले होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
अब्दुल अलीम खान रविवारी शेखूपुरा येथे इस्तेहकाम-ए-पाकिस्तान पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, सिंध आणि पंजाबमध्ये प्रत्येकी तीन-तीन नवीन प्रांत तयार केले जाऊ शकतात. असेच विभाजन बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्येही होऊ शकते. अलीम खान म्हणाले की, आपल्या शेजारील देशांमध्ये अनेक लहान प्रांत आहेत. त्यामुळे पाकिस्तानातही असेच व्हायला हवे. ताकद कोणामध्येही नाही, अशी धमकी सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी दिली आहे.
नवीन प्रांतांची मागणी यापूर्वीही अनेकदा झाली आहे; पण ती कधीही पूर्णत्वास गेली नाही. 1947 साली पाकिस्तानात पाच प्रांत होते. नवीन प्रांत निर्मितीसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या सत्ता संरचनेत गेल्या काही वर्षांत लष्कराचा प्रभाव वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रांतांचे विभाजन करण्याचा निर्णय हा प्रशासकीय सुधारणेपेक्षा राजकीय नियंत्रण वाढवण्याची रणनीती असू शकते. नवीन प्रांत तयार करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत लागते. जर पाकिस्तान 12 प्रांतांमध्ये विभागला गेला, तर देशाची प्रशासकीय रचना, राजकारण आणि संसाधनांचे वाटप पूर्णपणे बदलेल.