

इस्त्रायलच्या हवाई दलाने ‘ऑपरेशन मेनी वेज’ ही मोहीम राबवून 8 सप्टेंबर रोजी सीरियावर हल्ला केला होता. या कारवाईत सीरियातील क्षेपणास्त्र कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. चार महिन्यांनंतर इस्त्रायलकडून हा मोहिमेचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला. सीरियाच्या रडार यंत्रणेच्या नजरेस न आलेल्या या गुप्त मोहिमेविषयी थोडक्यात माहिती...
इस्त्रायलच्या सैनिकांनी अतिशय कठीण मोहीम पार पाडली होती. सीरियावर हल्ला करण्याआधी या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. सीरियातील क्षेपणास्त्र फॅक्टरीसाठी इराणकडून मदत केली जात होती. त्यामुळे हा क्षेपणास्त्रांचा अड्डाच या कारवाईत इस्रायलने नष्ट केला होता.
या मोहिमेसाठी कोड नेम ‘ऑपरेशन मेनी वेज’ असे ठेवण्यात आले होते. सीरियातील या अंडरग्राऊंड फॅक्टरीला डीप लेअर म्हणून ओळखले जात होते. सीरियाच्या पश्चिमेकडील सया भागात भूमिगत क्षेपणास्त्राचा कारखाना होता.
‘सया’ भागात क्षेपणास्त्रांची निर्मिती करून लेबनॉनमधील हिजुबल्ला आणि सीरियातील असाद राजवटीला या क्षेपणास्त्रांचा पुरवठा इराणकडून येत होता. त्यामुळी ही मोहीम फत्ते करण्यासाठी 120 कमांडोंसह 21 लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता.
इराणने अण्वस्त्रनिर्मितीच्या उद्देशानेच सीरियामध्ये क्षेपणास्त्राच्या निर्मितीचे काम 2017 पासून सुरू होती. पहाडी भागात जमिनीपासून 70 ते 130 मीटर अंतरावर खोलवर क्षेपणास्त्र फॅक्टरी सुरू करण्यात आली होती.
इस्रायलच्या हवाई दलाने तीन तास मोहीम राबवून मिसाईलची फॅक्टरी नेस्तनाबूत केली. यासाठी 660 पाऊंड स्फोटकांचा वापर करून क्षेपणास्त्रांचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. सीरियाच्या रडारच्या नजरेस पडू नये, यासाठी वैमानिकांनी भूमध्य सागरावरून उड्डाण केले होते. दमिश्कमध्ये प्रवेश केल्यानंतर सीरियाच्या सैनिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अन्य ठिकाणी हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कमांडोंनी विशेष लढाऊ विमानांद्वारे मिसाईलच्या फॅक्टरीला लक्ष्य केले.