Open AI वर सर्वांना मोफत Ghibli प्रतिमा बनवता येणार, CEO Sam Altman यांची घोषणा

मोफत प्रतिमा कशी बनवायची जाणून घ्‍या
openai ceo sam altman announces chatgpt image gen now rolled out to all free users
Open AI वर सर्वांना मोफत Ghibli प्रतिमा बनवता येणार, CEO Sam Altman यांची घोषणाFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ChatGPT मेकर OpenAI ने गेल्‍या आठवड्यात GPT 4o इमेज मेकर टूल सादर केले आणि ते लाँच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आता OpenAI चे CEO Sam Altman यांनी या विषयी एक पोस्‍ट केली आहे. त्‍यांनी सांगितलंय की, आता हे सर्वांना मोफत उपलब्‍ध होणार आहे. चला तर मग या विषयी जाणून घेऊया...

Sam Altman यांनी रविवारी एका पोस्टमध्ये म्हटले होते की वापरकर्त्यांनी थोडे सावकाशपणे घेतले पाहिजे. जेणेकरून त्यांच्या टीमला देखील थोडी झोप घेता येईल. घिब्ली इमेज जनरेटिव्हची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, ही इमेज तयार करण्यासाठी अनेक सूचनांचा पूर आला आहे. यामुळे चॅट जीपीटीच्या सर्व्हरवर दबाव आला आहे. यानंतर सॅम अल्‍टमॅन यांनी रविवारी पोस्‍ट करून सांगितले की, वापरकर्त्यांनी थोडं धीरान घेतलं पाहिजे, ज्‍यामुळे त्‍यांच्या टीमला देखील झाेप घेता येईल.

सॅम ऑल्टमन यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितले की, चॅटजीपीटी इमेज जेन आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध झाले आहे.

मोफत प्रतिमा अशी तयार करा

ही सेवा ChatGPT Plus सह सुरू करण्यात आली होती आणि आता ही सेवा मोफत देखील उपलब्ध आहे. येथे आम्ही तुम्हाला हे कसं वापरायचं याची संपूर्ण पद्धत सांगणार आहोत.

यासाठी, ChatGPT वेबसाइट किंवा अॅप उघडा. येथे तुम्हाला चॅटबॉक्समध्ये प्लस आयकॉन दिसेल.

  • तुम्ही '+' चिन्हावर क्लिक करून फोटो अपलोड करू शकता. यानंतर, वापरकर्त्यांना सूचित करावे लागेल.

  • एकदा प्रॉम्प्ट बॉक्समध्ये फोटो दिसला की, Ghiblify this लिहा किंवा ही प्रतिमा Studio Ghibli थीममध्ये बदला.

  • यानंतर तुम्हाला काही वेळ वाट पहावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो हा घिब्ली फॉरमॅटमध्ये दिसेल, जो तुम्ही डाउनलोड करू शकता.

  • ही प्रतिमा डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही ती सोशल मीडियावर किंवा प्रोफाइल चित्र म्हणून वापरू शकता.

Ghibli चा जपानशी काय संबंध आहे?

Ghibli शैलीतील फोटोची प्रत्यक्षात सुरूवात जपानमधील एका प्रसिद्ध अॅनिमेशन कंपनीकडून करण्यात आली आहे. ही कंपनी हयाओ मियाझाकी यांनी स्थापन केली होती. हा स्टुडिओ Spirited Away, My Neighbor Totoro आणि Kiki's Delivery Service सारख्या उत्तम चित्रपटांसाठी ओळखला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news