

Toronto shooting : कॅनडातील टोरंटोच्या लॉरेन्स हाइट्समध्ये मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून पाज जण जखमी आहेत. हल्लेखोराचा शोध सुरु आहे, अशी माहिती टोरांटो पोलिसांनी 'एक्स' पोस्टच्या माध्यमातून दिली.
टोरांटोमधील फ्लेमिंग्टन आणि झाचेरी रोड्सजवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यामध्ये सहा जण जखमी झाले. पोलिसांसह आपत्त्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली. सर्व जखमी हे १८ ते ४० वयोगटातील आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची पुष्टी टोरंटो पोलिसांनी केली. हल्लेखोराचा शोध सुरु आहे, अशी माहिती टोरांटो पोलिसांनी 'एक्स' पोस्टच्या माध्यमातून दिली.
या घटनेची माहिती देताना टोरांटोच्या महापौर ओलिव्हिया चाऊ यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "लॉरेन्स हाइट्स परिसरात झालेल्या गोळीबाराच्या वृत्ताने मला अतीव दुःख झाले आहे. माझे कार्यालय टोरंटो पोलिसांच्या संपर्कात आहे. अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती योग्यरित्या हाताळल्याबद्दल टोरंटो पोलिस, अग्निशमन आणि पॅरामेडिक सेवा यांचे आभार मानते. या घटनेबाबत टोरांटो पोलीस लवकरच अपडेट देतील.