ओरफिश आढळला किनाऱ्यावर :धोक्‍याचे संकेत ?

oarfish fish on California shores | समुद्रातील भुकंपामुळे येतात किनाऱ्यावर
‘Doomsday’ fish on California shores
कॅलिफोनिर्याच्या किनाऱ्यावर आढळलेला ओरफिशImage source X
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

कॅलिफोनिर्याच्या किनाऱ्यावर गूढ असलेला ओरफिश मासा मृतावस्‍थेत आढळला आहे. या मासा नेहमी खोल समुद्रात आढळतो. हा मासा किनाऱ्यावर आढळणे म्‍हणजे धोक्‍याचे संकेत असल्‍याचे अनेक मिथकांमध्ये आढळते. विषेशता जपानमध्ये या माशाचे दिसणे हे अशूभ संकेत मानले जातात. त्‍यांच्या लोककथांच्या मान्यतेनुसार जमिनीखाली विशेषतः समुद्रात होणारे मोठे भुकंप व त्‍याद्वारे येणारी त्‍सुनामी याच्याशी या घटनेचा संबध जोडला जातो. सीएनएन या वृत्तसंस्‍थेने यासंबधीचे वृत्त दिले आहे.

आता हा मृतावस्‍थेतील मासा कॅलिफोनिर्यातील ऐन्सिनिटीस किनाऱ्यावर आढळून आला आहे. याची लांबी ९ फुटांची आहे. खोल समुद्रातील गेल्‍या तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. ही घटना दुर्मिळ असून गेल्‍या शतकात केवळ २२ वेळा असे घडले आहे असे वैज्ञानिकांचे म्‍हणने आहे. वैज्ञानिकांच्या मते टेक्‍टोनिक प्लेटांमधील हालचाली व घर्षणामुळे होणाऱ्या भुकंपात असे जलचर मरण पावतात व तरंगत किनाऱ्यावर येतात. मेसोपेलॅजिक झोन जो समुदात ३००० हजार फुटांपेक्षा अधिक खोलवर असतो अशा ठिकाणी या घटना घडत असतात.

यापूर्वी आढळलेला ओरफिश हा १२ फुट लांबीचा होता व तो ऑगस्‍ट महिन्यात सॅन डियागो जवळच्या समुद्र किनाऱ्यावर आढळला होता. ओरफिशला ‘समुद्री सर्प’ सुद्धा म्‍हटले जाते हा चांदीसारखा चकचकीत असून याची लांबी ३० फुटापर्यंत वाढू शकते. हे मासे क्वचितच जिवंत आढळतात, कारण ते संकटात असतानाच त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडतात. यामुळे हे मासे धोक्‍याचे संकेत असू शकतात असे काही तज्ञांचे मत आहे.

हे मासे किनाऱ्यावर येणे हे समुद्रातील परिस्‍थितील बदल हे प्रमुख कारण आहे. या माशाच्या सापडण्यामुळे समुद्रातील रहस्‍यमय जलचरांचा अभ्‍यास करणे शक्‍य होणार आहे. तसेच उत्‍क्रांतीमधील बदल सुद्धा या दुर्मीळ माशाच्या संशोधनातून लक्षात येऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news