किम जोंग यांची रशियाला मोठी मदत, पाठवले हजारो सैनिक, दक्षिण कोरियाची तातडीची बैठक

किम जोंग रशियाच्या मदतीला; युक्रेन विरोधातील युद्धासाठी पाठवले हजारो सैनिक
north korea kim jong sends army to help russia putin against ukraine
किम जोंग यांची रशियाला मोठी मदत, पाठवले हजारो सैनिक, दक्षिण कोरियाची तातडीची बैठकFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

रशिया आणि यूक्रेन या दोन देशांमध्ये गेल्‍या २ वर्षांपेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. या दोन्ही देशातील कोणताही एक देश निर्णायक आघाडी घेवू शकलेला नाही. एका बाजुला पाश्चात्‍य देश यूक्रेनला युद्ध सामग्री अविरतपणे पुरवत आहेत. तर दुसरीकडे रशियालाही मोठी मदत मिळाली आहे. दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्थेने दावा केला आहे की, उत्‍तर कोरियाचा तानाशहा किम जोंग उन ने रशियाला युद्धात मदतरूपात हजारो सैनिकांना पाठवले आहे. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्‍ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन यांच्यामध्ये भेट झाली होती. यामध्ये दोन्ही देशांमध्ये मोठे करार केले होते.

दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्‍या रशिया-यूक्रेन युद्ध आणि घातक मार्गावर पोहोचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आता उत्‍तर कोरियाचा तानाशहा किम जोंगने रशियाच्या मदतीसाठी हजारो सैनिक पाठवले आहेत. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्‍थांनी हा दावा केला आहे.

किती सैनिक पाठवले?

दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्‍थांनी सांगितले की, यूक्रेनने युद्धात मदतीसाठी रशियाला १२,००० सैनिक पाठवले. दक्षिण कोरियाच्या योनहाप न्यूज एजन्सीने आज (शुक्रवार) या विषयी माहिती दिली.

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली बैठक

उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी सैन्य पाठवल्याच्या मुद्द्यावर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक घेतली आहे. राष्ट्रपती युन सुक येओल यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की,राष्ट्रपतींनी आपत्कालीन बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. उत्तर कोरियाने सैन्य पाठवण्याचे वृत्त खरे मानले आहे की नाही याची अद्याप सरकारने पुष्टी केलेली नाही.

ऑस्ट्रेलिया युक्रेनला रणगाडे देणार

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने युक्रेनला त्यांच्या 49 M1A1 अब्राम रणगाडे देण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स यांनी सांगितले की, युक्रेनने काही महिन्यांपूर्वी हा रणगाडा देण्याची विनंती केली होती. मार्ल्स म्हणाले की, ऑस्ट्रेलियन सरकार युक्रेनला त्यांच्या अमेरिकन बनावटीच्या M1A1 टँक देत आहे, ज्यांची किंमत २४५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (१६३ दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news