

Nobel Prize in chemistry : रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे आज (दि. ७) करण्यात आली. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमू किटागावा (Susumu Kitagawa), रिचर्ड रॉबसन (Richard Robson) आणि ओमर एम. याघी (Omar M. Yaghi) यांना ‘मेटल-ऑरगॅनिक फ्रेमवर्कच्या (Metal-Organic Frameworks - MOFs) विकासासाठी’ प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. १९०१ ते २०२४ या काळात एकूण ११६ रसायनशास्त्र पुरस्कार १९५ व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहेत.
२०२५ चा पहिला नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला. वैद्यकशास्त्रातील पुरस्कार मेरी ई ब्रुन्को, फ्रेड रॅम्सडेल आणि डॉ. शिमोन साकागुची यांना 'बाह्य रोगप्रतिकारशक्ती सहनशीलता' (peripheral immune tolerance) संबंधीच्या शोधांसाठी देण्यात आला. मंगळवारी (दि. ७) भौतिकशास्त्रातील पुरस्कार जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना त्यांच्या 'सबअॅटॉमिक क्वांटम टनेलिंग' या अद्भुत जगावरील संशोधनासाठी जाहीर करण्यात आला आहे. आता गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी साहित्य क्षेत्रातील नोबोल जाहीर होईल. त्यानंतर १० ऑक्टोबरला नोबेल शांतता पुरस्कार आणि सोमवार, १३ ऑक्टोबरला अर्थशास्त्र पुरस्काराची घोषणा होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण १० डिसेंबर रोजी, नोबेल पुरस्कारांचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित समारंभात केले जाईल.