'Why Nations Fail..' : राष्ट्रांच्या अपयशाची चिकित्सा करणाऱ्यांना अर्थशास्त्राचे नोबेल

दीर्घकालीन समृद्धीसाठी लोकशाही व्यवस्था सर्वोत्तम आहे, असे या संशोधकांनी मांडले आहे.
Why Nations Fail..
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही वर्षांतील चर्चेतील पुस्तके म्हटले तर डोळ्यापुढे येणारी नावे म्हणजे Capital in 21st Century तसेच नोवाल युवाल हरारी यांची सेपियन्स. याच मालिकेतील आणखी एक पुस्तक आहे Why Nations Fail - The Origins of Power, Prosperity and Poverty. एखादा देश किंवा एखादा समाज यशस्वी होतो, आपल्या नागरिकांसाठी समृद्ध जीवन निर्माण करू शकतो, पण याच वेळी बरेच देश, समजाव्यवस्था अपयशी ठरतानाही दिसतात. याची कारणीमीमांसा या पुस्तकातून केली गेली आहे आणि या संदर्भात जगाला नवा दृष्टिकोन देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरले आहे.

लोकशाही व्यवस्था सर्वोत्कृष्ट

सोमवारी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. डेरॉन अॅसेमोग्लू, सिमॉन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अॅसमोग्लू आणि रॉबिन्सन यांनी Why Nations Fail: The Origins of Power, Prosperity and Poverty हे पुस्तक २०१२ला लिहिले होते.

दीर्घकाळापर्यंत समृद्धी हवी असेल, तर लोकशाही व्यवस्था ही सर्वोत्तम आहे, असा अनुमान या अर्थतज्ज्ञांचा आहे. हुकुमशाही व्यवस्था साधनसंपत्ती आणि कामगारांचा वापर करण्यात यशस्वी ठरत असल्या तरी हुकुमशाहीमध्ये नवीन्य आणि कल्पकेता यांना स्थान नसते. "त्यामुळे हुकुशाहीतील विकास हा स्थीर नसतो, आणि त्यातून कल्पकता जन्माला येऊ शकत नाही," असे डेरॉन अॅसेमोग्लू यांनी म्हटले आहे.

'उत्तम प्रशासन आणि लोकांबद्दल परिपूर्ती आवश्यक'

सध्याच्या काळात लोकशाही व्यवस्था कठीण काळातून जात आहे आणि लोकशाही व्यवस्थांना उत्तम प्रशासन आणि लोकांबद्दली परिपूर्ती यासाठी अधिक काम करावे लागेल, असे त्यांचे मत आहे.

१७७६मध्ये अॅडम स्मिथ यांनी अर्थशास्त्रात अत्यंत मूलभूत मांडणी केली. An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations हा त्यांचा ग्रंथ पुढील काळातील अर्थशास्त्रासाठी पाया ठरला. त्यानंतरच्या काळात कामाची विभागणी आणि खुला व्यापार यावर जगभरातील अर्थतज्ज्ञांनी बरेच संशोधन केले. तर गेल्या काही दशकात संस्थात्मक अर्थशास्त्राला मोठे महत्त्व आले आहे. यामध्ये नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ डग्लस नॉर्थ यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. याच संशोधकांच्या यादीत आता अॅसमोग्लू, रॉबिन्सन आणि सिमॉन जॉन्सन यांचे नाव घ्यावे लागेल.

Why Nations Fail..
Economic Nobel Prize 2024 | एसेमोग्लू, जॉन्सन आणि रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news