'या' घोर अपराधाबद्दल मस्क यांचे प्रायश्चित; ऑम्लेट खाणे केले बंद

Xवर व्हायरल पोस्टवर मिम्सचा पाऊस
Elon Musk Omelette Comment
एलन मस्क यांनी एक आठवडा ऑम्लेट खाणार नसल्याचे म्हटले आहे. X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्पेस एक्स, टेस्ला, एक्स अशा अग्रगण्य कंपन्यांचे मालक असलेले अब्जाधिश एलन मस्क यांनी एक आठवडा ऑम्लेट न खाण्याचे ठरवले आहे. एका 'घोर' अपराधाचे प्रायश्चित म्हणून मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. आता मस्क यांची एक्स वर पोस्ट केलेली ही घोषणा मस्करी आहे, खरोखरच प्रायश्चित आहे, हे मात्र मस्कच सांगू शकतात.

मस्क यांनी काय 'अपराध' केला?

झाले असे की एका एक्स युजरने न्यू यॉर्क टाईम्सचे पान १ शेअर केले होते. पान क्रमांक १वर न्यू यॉर्क टाइम्स घडीच्यावर देत असलेल्या बातम्या या सर्वांत महत्त्वाच्या असतात असे या युजरचे मत होते. या बातम्यांमध्ये स्पेस एक्सच्या उड्डाणामुळे वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित राहिला आहे, स्पेस एक्सच्या एका उड्डाणावेळी पक्ष्यांची नऊ घरटी उद्ध्वस्त झाली होती, ही बातमी हेडलाईन करण्यात आली होती. असे या युजरने दाखवून दिले. युजरने ही पोस्ट एलन मस्क यांना टॅगही केली आहे.

यावर मस्क यांनी लागलीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "या निर्घृण अशा गुन्ह्याचे प्रायश्चित म्हणून मी एक आठवडा ऑम्लेट खाणार नाही."

मस्क यांच्या या उत्तरावर एक्सवर मिम्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला नसता तरच नवल.

या निर्घृण अशा गुन्ह्याचे प्रायश्चित म्हणून मी एक आठवडा ऑम्लेट खाणार नाही.

एलन मस्क

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news