नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी, हिरे व्यापारी नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्याची मागणी सीबीआयने ब्रिटनकडे केली आहे.
नीरव मोदी १३,५०० कोटींच्या पीएनबी गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आहे. तो भारतातून फरार झाला आहे. त्याला आता भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्याचा ठावठिकाणा शोधला जात होता. अखेर तो ब्रिटनमध्ये असल्याचे ब्रिटन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या भारतात प्रत्यार्पणासाठी सीबीआयने मागणी केली आहे.
गेल्या जुलै महिन्यात नीरव मोदी विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.