Benjamin Netanyahu | नेतान्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांचे इस्रायलकडून खंडन; जिवंत असतील तर सोडणार नसल्‍याचा इराणचा इशारा

Benjamin Netanyahu death rumours | एआय-निर्मित व्हिडिओवरून सोशल मीडियावर मृत्यूबाबत तर्कवितर्क
Benjamin Netanyahu death rumours
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूFile Photo.
Published on
Updated on

Benjamin Netanyahu death rumours

जेरुसलेम: मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या व्हायरल दाव्यांना त्यांच्या कार्यालयाने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. एका ताज्या भाषणाच्या कथित एआय-निर्मित (AI-generated) व्हिडिओवरून सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्‍यान, एकीकडे नेतान्‍याहूय यांच्‍या मृत्‍यूची अफवा असतानाच, आमच्‍या मुलांना मारणारा जिंवत असले तर सोडणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे.

नेतान्‍याहू यांची हत्‍या झाल्‍याचे सोशल मीडियावर दावे

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या दरम्यान नेतान्याहू यांची हत्या करण्यात आली असल्याचे दावे शनिवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. तुर्कीच्या 'अनादोलू एजन्सी'ने या वृत्ताबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने हे दावे फेटाळले. "या सर्व अफवा असून पंतप्रधान पूर्णपणे सुखरूप आहेत," असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Benjamin Netanyahu death rumours
Iran Supreme Leader successor | इराणमध्‍ये खामेनींचा वारसदार कोण ? सर्वोच्‍च नेत्‍याची निवड कशी होते? कोण आहेत दावेदार?

एआय व्हिडिओच्या दाव्यामुळे संभ्रम

नेतान्याहू यांनी शुक्रवारी त्यांच्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ते इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षावर पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिसत होते. या व्हिडिओनंतरच अफवांना उधाण आले. काही युजर्सनी असा दावा केला की, भाषणादरम्यान नेतान्याहू यांनी हात वर केला असता त्यांच्या उजव्या हाताला सहा बोटे दिसत होती.एआयद्वारे तयार केलेल्या फोटोंमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सहसा हाताच्या बोटांमध्ये अशा चुका (AI finger glitch) आढळतात, असा दावा करत नेतान्याहू यांचा हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगण्यात आले.

Benjamin Netanyahu death rumours
Donald Trump |प. आशियातील तणावादरम्यान अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प- इंग्‍लंडचे PM स्टार्मर आमने-सामने; नेमकं कारण काय?

कॅन्डेस ओवेन्स यांच्‍या सवालामुळे चर्चेला उधाण

अमेरिकन राजकीय भाष्यकार कॅन्डेस ओवेन्स यांनीही 'X' वर प्रश्न उपस्थित केल्याने ही चर्चा अधिक पसरली. त्यांनी विचारले, "बिबी (नेतान्याहू) कुठे आहेत? त्यांचे कार्यालय बनावट एआय व्हिडिओ का प्रसिद्ध करत आहे आणि व्हाईट हाऊसमध्ये भीतीचे वातावरण का आहे?"

Benjamin Netanyahu death rumours
India–China Relations |'आम्ही शत्रू नव्हे...' : मध्य-पूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान

नेतान्‍याहू जिवंत असतील तर सोडणार नाही : इराणचा इशारा

नेतान्‍याहू यांच्‍या मृत्‍यूची अफवा असतानाच, आमच्‍या मुलांना मारणारा जिंवत असले तर सोडणार नाही. त्‍यांचा माग काढून जीव मारण्याची शपथच इराणने घेतली आहे. दुसरीकडे, नेतान्याहू यांचा मुलगा 'याइर नेतान्याहू' हा देखील सोशल मीडियावरून "गायब" असल्याचे बोलले जात आहे. ९ मार्चपासून त्याने कोणतीही पोस्ट केलेली नाही. गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात ८६ वर्षीय सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले जात आहेत. या युद्धात आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला असून, त्यापैकी बहुतांश नागरिक इराणमधील असल्याचे वृत्त आहे.

तेल निर्यात केंद्रावर आणखी हल्ले करण्याची ट्रम्‍प यांची धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या 'खर्ग बेट' या तेल निर्यात केंद्रावर आणखी हल्ले करण्याची धमकी दिली आहे. तसेच, जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मित्र राष्ट्रांनी युद्धनौका तैनात कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुसरीकडे, इराणनेही प्रत्युत्तर तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना, ट्रम्प म्हणाले की अमेरिकन हल्ल्यांनी खर्ग बेटाचा मोठा भाग "पूर्णपणे उद्ध्वस्त" केला आहे. शनिवारी NBC न्यूजशी बोलताना त्यांनी अधिक हल्ल्यांचा इशारा देत म्हटले, "कदाचित आम्ही आणखी काही वेळा तिथे हल्ले करू." असे म्‍हटलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news