Nepal Prime Minister | नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारचा रविवारी फैसला

पंतप्रधान ओली यांना १६६ खासदारांचा पाठिंबा
KP Sharma Oli to take a vote of confidence on 21st July
नेपाळ पंतप्रधान केपी शर्मा ओली रविवारी (दि. २१) विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. ANI Twitter Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेपाळच्या राष्ट्रपती कार्यालयाने सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. केपी शर्मा ओली यांनी सोमवारी (दि.१५) सकाळी ११ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, पंतप्रधान ओली रविवारी (दि. २१) आपल्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. त्यांना १६६ खासदारांचा पाठिंबा आहे. ज्यात यूएमएलचे ७८ आणि नेपाळी काँग्रेसचे ८८ खासदार आहेत.

KP Sharma Oli to take a vote of confidence on 21st July
नेपाळ : त्रिशूली नदीत भूस्खलनाने २ बस वाहून गेल्या, सात ठार

आतापर्यंत नेपाळमध्ये १३ वेगवेगळी सरकारे स्थापन

दरम्यान, राजेशाही संपुष्टात आल्यानंतर २००८ मध्ये राज्यघटना स्वीकारल्यानंतर नेपाळमध्ये १३ वेगवेगळी सरकारे स्थापन करण्यात आली आहेत. देशाची राजकीय स्थिरता आणि विकास राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगत ओली यांनी गुरुवारी 'प्रचंड'ला वगळून नेपाळी काँग्रेससोबत आघाडी सरकार स्थापन करण्याच्या आपल्या पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केले.

KP Sharma Oli to take a vote of confidence on 21st July
नेपाळ : त्रिशूली नदीत भूस्खलनाने २ बस वाहून गेल्या, ६५ बेपत्ता; शोध कार्य सुरु

ओली यांच्या नेतृत्वाखाली भारत-नेपाळ संबंध बिघडले

याआधी, ओली ११ ऑक्टोबर २०१५ ते ३ ऑगस्ट २०१६ या काळात देशाचे पंतप्रधान होते. या काळात नवी दिल्लीशी काठमांडूचे संबंध तणावपूर्ण होते. यानंतर त्यांनी ५ फेब्रुवारी २०१८ ते १३ मे २०२१ पर्यंत पंतप्रधान म्हणून काम पाहिले. आपल्या पहिल्या कार्यकाळात, ओली यांनी नेपाळच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल भारतावर जाहीरपणे टीका केली आणि भारतावर त्यांचे सरकार पाडल्याचा आरोप केला होता.नेपाळमध्ये संविधान लागू झाल्यावर तेथे हिंसक निदर्शने झाली. या निषेधामागे भारताचा हात असल्याचा आरोप ओली यांनी केला होता. त्यांच्या काळात नेपाळच्या नकाशात भारतीय प्रदेश दाखवले गेले. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news