

अमेरिकेने ध्वनीच्या गतीपेक्षाही वेगाने उड्डाण करणार्या पहिल्या एक्स-59 सुपरसॉनिक विमानाची यशस्वी चाचणी केली आहे. विशेष म्हणजे, या विमानातून कारचा दरवाजा बंद केल्यासारखा आवाज येतो. हे विमान एका तासात 1,508 किलोमीटरचे अंतर पार करू शकते.
पहिले यशस्वी उड्डाण
अमेरिकेने ध्वनीच्या गतीपेक्षाही वेगाने उडणार्या एक्स-59 सुपरसॉनिक विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण करून संपूर्ण जगाला चकित केले आहे. विशेष म्हणजे, उड्डाण करताना हे विमान जास्त आवाज करत नाही. शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की, हे शांत विमान ध्वनीच्या गतीपेक्षा वेगाने उड्डाण करू शकते.
मुख्य वैशिष्ट्य काय
59 हे क्वाईट सुपरसॉनिक टेक्नॉलॉजी प्रकल्पांतर्गत विकसित केले आहे. हे एक अद्वितीय प्रोटोटाईप विमान आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सॉनिक बूम (ध्वनीचा मोठा आवाज) कमी करणे आहे, जो पारंपरिक सुपरसॉनिक विमानांमध्ये 110-140 डेसिबलचा (विजेच्या कडकडाटासारखा मोठा धमाका) आवाज निर्माण करतो.
एका तासात 1508 किलोमीटर अंतर कापणार
हे सिंगल-सीटर विमान मच 1.4 (सुमारे 937 मैल प्रति तास) म्हणजेच 1508 किलोमीटर प्रति तास या कमाल गतीपर्यंत पोहोचू शकते. मात्र, पहिल्या उड्डाणात ही गती 250 नॉटस् (सबसॉनिक) पर्यंत मर्यादित होती.
500 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
99 फूट लांब, 29 फूट पंखांचा विस्तार आणि 414 इंजिनने सुसज्ज असलेले हे विमान 2018 पासून विकसित होत आहे, ज्यामध्ये नासाने 500 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. 2027-28 पर्यंत ही उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.