NASA Moon Base Mission | चंद्रावर 'परमानेंट बेस' बनवणार NASA; रोव्हर अन् ड्रोनही तिथेच राहणार, २० अब्ज डॉलर्सचा मेगाप्लॅन!

NASA Moon Base Mission | नवीन मोहिम मानवेतच्‍या भविष्‍याची तयारी असल्‍याचा नासाचा विश्‍वास
NASA Moon Base Mission
अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'ने (NASA) चंद्रावर कायमस्वरूपी तळ (Permanent Base) स्थापन करण्यासाठी तीन मोठ्या मोहिमांची घोषणा केली आहे. Pudhari
Published on
Updated on

NASA Moon Base Mission

वॉशिंग्टन : चंद्राभोवतीची (Lunar flyaround) मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'ने (NASA) चंद्रावर कायमस्वरूपी तळ (Permanent Base) स्थापन करण्यासाठी तीन मोठ्या मोहिमांची घोषणा केली आहे. मंगळवारी (दि. २६) झालेल्या पत्रकार परिषदेत नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमॅन यांनी २० अब्ज डॉलर्सच्या (सुमारे १.६ लाख कोटी रुपये) भव्य योजनेचे अनावरण केले. या चंद्र तळावर (Moon Base) लूनर रोव्हर्स आणि ड्रोन तैनात केले जातील, ज्यांच्या मदतीने चंद्रावरील धोकादायक वातावरणात राहण्याचा आणि काम करण्याचा सराव केला जाईल.

खगोलीय जगात मानवाची पहिली कायमस्‍वरुपी 'चौकी'

महत्त्‍वाकांक्षी योजनेबाबत माहिती देताना नासाचे प्रमुख जेरेड आयझॅकमॅन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "अमेरिका पुन्हा एकदा चंद्रावर परतत आहे आणि हे केवळ एक मिशन नसून मानवतेच्या भविष्याची तयारी आहे. चंद्रावर बनणारा हा बेस इतर कोणत्याही ग्रहावर किंवा खगोलीय जगावर मानवाची पहिली कायमस्वरूपी चौकी (First Permanent Outpost) असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NASA Moon Base Mission
SpaceX Starship test flight |एलन मस्क यांच्या 'स्पेसएक्स स्टारशिप'ची मोहीम फत्ते! हिंदी महासागरात 'स्प्लैशडाउन'!

पुढील काही वर्षांत ३ मोठी मिशन्स

नासाचा उद्देश केवळ चंद्रापर्यंत पोहोचणे हा नाही, तर तिथे राहून काम करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे. यासाठी एजन्सी पुढील काही वर्षांत तीन मोठी मिशन्स लॉन्च करणार आहे. या मोहिमांच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर आवश्यक उपकरणे पाठवली जातील आणि मानवाच्या राहण्यायोग्य वातावरण तयार केले जाईल.

NASA Moon Base Mission
Artemis 2 mission: ‘आर्टेमिस-2’च्या यशाचे गमक

सप्टेंबर २०२६ नंतर 'Moon Base-I' मिशन

नासाने स्‍पष्‍ट केले की, आपलं पहिले मिशन 'Moon Base-I' या वर्षाच्या सप्टेंबर महिन्यानंतर लॉन्च केले जाऊ शकते. यासाठी 'ब्लू ओरिजिन' च्या "Blue Moon Mark 1 Endurance" लँडरची निवड करण्यात आली आहे. हे मिशन चंद्रावर अनेक वैज्ञानिक उपकरणे घेऊन जाईल. यामध्‍ये विशेष कॅमेरे आणि लेझर सिस्टीमचा समावेश असेल, चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करताना रॉकेटच्या थ्रस्टर्सचा काय परिणाम होतो, हे समजण्यास मदत होईल. हे मिशन चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलेटन कनेक्टिंग रिज' भागात उतरेल. भविष्यातील मानवी मोहिमांसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो, असे नासाचे मानणे आहे.

NASA Moon Base Mission
Artemis II mission : ‘आर्टेमिस-2‌’ने मोडला ‌‘अपोलो-13‌’चा 55 वर्षांपूर्वीचा विक्रम

'Moon Base-II' चंद्रावर खास रोव्हर पाठवलं जाणार

'Moon Base-II' (याच वर्षी): नासाचे दुसरे मिशन 'Moon Base-II' देखील याच वर्षात लॉन्च केले जाईल. या मोहिमेत ११०० पाउंडपेक्षा जास्त वजनाचे साहित्य चंद्रावर पाठवले जाईल. विशेष म्हणजे, यामध्ये एक खास रोव्हर "FLIP Rover" देखील पाठवला जाणार आहे. हा रोव्हर चंद्राच्या खडतर पृष्ठभागावर चालण्याचे आणि तिथे काम करण्याचे तंत्रज्ञान अधिक प्रगत करण्यास मदत करेल.

NASA Moon Base Mission
NASA Artemis-II Mission Moon : तब्बल पन्नास वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राच्या दारी!, अंतराळवीर खाणार काय? झोपणार कसे?

'Moon Base-III' करणार 'लूनर स्वर्ल्स'चा अभ्‍यास

तिसरे मिशन 'Moon Base-III' देखील या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉन्च करण्याची योजना आहे. हे मिशन चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या गूढ आणि चमकदार खुणा म्हणजेच 'लूनर स्वर्ल्स' (Lunar Swirls) चा अभ्यास करेल. वैज्ञानिकांच्या मते, या खुणा चंद्राच्या अंतर्गत भागात असलेल्या चुंबकीय शक्तींशी संबंधित असू शकतात. या मोहिमेत युरोपियन स्पेस एजन्सी आणि कोरियन स्पेस एजन्सी देखील सहभागी होणार आहेत.

NASA Moon Base Mission
Lunar Eclipse : चंद्राच्या अगदी जवळून चंद्रग्रहणाचा अद्भूत नजारा; पाहा NASA चा खास व्हिडिओ

मोहिमेचा उद्‍देश काय?

नासा ड्रोनसारख्या तंत्रज्ञानावरही काम करत आहे. भविष्यात हे ड्रोन चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करतील. तसेच मानवांसाठी सुरक्षित मार्ग शोधतील. भविष्यात माणसाने चंद्रावर अगदी तशाच प्रकारे काम करावे, जसे तो आज पृथ्वीवर करतो, अशी नासाची इच्छा आहे. नासाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, एक दिवस असा येईल जेव्हा माणूस चंद्रावर कायमस्वरूपी वास्तव्य करेल. हे मिशन केवळ अंतराळाचा शोध घेण्यापुरते मर्यादित नसून, भविष्यात दुसऱ्या ग्रहांवर मानवी वस्ती उभारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

३ टप्प्यांत पूर्ण होणार 'मेगा प्लॅन'

  • पहिला टप्पा हा आगामी तीन वर्षांमध्‍ये पूर्ण होईल. यामध्‍ये तंत्रज्ञानाची चाचणी आणि प्राथमिक तयारी होईल. चंद्रावर चालणारी वाहने आणि आवश्यक यंत्रणा तयार केली जाईल. नासाचे लक्ष्य २०२८ पर्यंत मानवाला पुन्हा चंद्रावर उतरवण्याचे आहे.

  • २०२९ ते २०३२ या कालावधीत नासा दुसर्‍या टप्‍प्‍यात चंद्रावर कायमस्वरूपी पायाभूत सुविधा तयार करण्‍याचा प्रयत्‍न करेल. यामध्ये वीज व्यवस्था, दळणवळण नेटवर्क आणि राहण्याच्या सुविधांचा समावेश असेल.

  • तिसरा टप्पात नासा चंद्रावर मानवाचा वावर सातत्याने कायम ठेवण्यासाठी तयारी करेल. म्हणजेच तिथे नियमितपणे अंतराळवीर पाठवले जातील आणि वैज्ञानिक उपक्रम सतत सुरू राहतील. "त्यानंतर आपण अभिमानाने सांगू शकू की, 'आम्ही आता चंद्रावर कायमचे स्थायिक झालो आहोत आणि आम्ही इथून मागे हटणार नाही,'" असा विश्‍वास नासाच्या मून बेस प्रोग्रामचे एक्झिक्युटिव्ह कार्लोस गार्सिया-गॅलन यांनी विश्‍वास व्‍यक्‍त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news