

पुढारी ऑनलाईन डेस्कः
केनिया देशातील एका गावात एक अवकाशातील एक वस्तू पडल्याची घटना घडली. ही वस्तू काय आहे याचे कुतूहूल नागरिकांसह संशोधकांना लागून राहिले आहे. केनिया च्या माध्यमांमध्ये याची माहिती प्रसारित होताच लगेच देशाच्या स्पेस एजन्सींची याची तपासणी सुरु केली आहे. याबाबतचे वृत्त सीएनएन या वृत्तसंस्थेन दिले आहे.
केनियाच्या स्पेस एजन्सीने सांगितले की स्पेस ऑब्जेक्टमधील एखादा हा भाग असू शकतो. असा अंदाज व्यक्त केला आहे. एका दुर्गम भागातील एका खेड्यात हा भाग सापडला आहे. मुकुकु नावाच्या दक्षिणेकडील भागात हे गाव येते. गोलाकार असलेल्या या वस्तूचा व्यास जवळपास ८ फुटाचा असून वजन जवळपास ५०० किलो आहे.
एका धातूच्या रिंग स्वरुपात असलेली ही वस्तू रॉकेटचा एक भाग असू शकतो. पण अवकाशातून रॉकेटसारख्या वस्तू परत येत असताना त्या समुद्रात पडतात. किंवा जळून खाक होतात. त्यामुळे जमीनवर पडलेला व ५०० किलो वजनाच्या या वस्तूमूळे संशोधकांचे कुतूहूल जागे झाले आहे.