Munir US tour | मुनीर तिसर्‍यांदा अमेरिकेला जाणार

ट्रम्प यांना भेटणार; गाझा मिशनमध्ये सहभागाची चर्चा, इस्लामी राष्ट्रांचा विरोध
donald trump - asim munir
Munir US tour | मुनीर तिसर्‍यांदा अमेरिकेला जाणार Pudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे सैन्यप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर लवकरच अमेरिकेला तिसर्‍यांदा भेट देणार आहेत, अशी माहिती रॉयटर्सच्या अहवालातून समोर आली आहे. या दौर्‍यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. गाझासाठी अमेरिकेच्या पाठबळाने होत असलेल्या स्थिरीकरण दलामध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या सहभागाबाबत यात चर्चा होऊ शकते.

या वर्षातील हा मुनीर यांचा तिसरा दौरा ठरू शकतो. तथापि पाकिस्तानमधील राजकीय सत्ता आणि परराष्ट्र धोरणातील त्यांचा वाढता सहभाग यामुळे तज्ज्ञांच्या मते, मुनीर यांचा हा तिसरा अमेरिका दौरा त्यांच्यासाठी तापदायक ठरू शकतो. त्यांना देशांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागू शकते. पाक जनतेमध्येही असंतोष आहे. इस्रायल-गाझा शांततेसाठी ट्रम्प यांच्या 20 पॉईंट योजनेनुसार मुस्लिम बहुल देशांमधून गाझासाठी एक दल तयार करण्यात येणार आहे. हे दल युद्धग्रस्त पॅलेस्टिनी प्रदेशात पुनर्निर्माण आणि आर्थिक पुनरुत्थानाच्या काळात देखरेख करेल. या मिशनचा भाग म्हणून इस्लामिक दहशतवादी संघटना हमासला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल. तथापि, या धोरणामुळे काही मुस्लिम देशांनी चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक पॅलेस्टाईनवादी मतदारांमध्ये यामुळे राग निर्माण होऊ शकतो.

मुनीर-ट्रम्प संबंध

जूनमध्ये मुनीर यांंना व्हाईट हाऊसमध्ये लंचसाठी आमंत्रण दिले गेले होते. तेव्हा ट्रम्प यांनी एकट्या मुनीर यांनाच भेट दिली होती. इतर कोणतेही नेते यावेळी उपस्थित नव्हते. दरम्यान, पाकच्या सैनिकांनी या दलात सहभाग घेतला नाही, तर ट्रम्प रागावू शकतात. तसेच अमेरिकेची पाकिस्तानातील गुंतवणूक आणि अमेरिकेकडून मिळणारी सुरक्षा मदत पाकिस्तानसाठी जास्त महत्त्वाची आणि मोठी आहे.

हमास निष्क्रिय करणे आमचे काम नाही : इशाक दार

पाकिस्तान हा एकमेव मुस्लिमबहुल, अण्वस्त्रसंपन्न देश आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी सांगितले की, पाकिस्तान शांतीसाठी सैनिक पाठवण्याचा विचार करू शकतो; परंतु हमास निष्क्रिय करणे हे आपले काम नाही.

राजकीय आणि धार्मिक विरोध

गाझा प्रस्तावाबाबत मुनीर यांनी अलीकडेच इंडोनेशिया, मलेशिया, सौदी अरेबिया, तुर्की, जॉर्डन, इजिप्त आणि कतार यांसारख्या देशांच्या नेत्यांची तसेच वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांची भेट घेतली होती; पण पाकिस्तानातच अमेरिकेच्या या योजनेेंतर्गत सैनिक पाठवण्यास नागरिकांचा विरोध होऊ शकतो. पाकसह या देशातील अनेक इस्लामी गट अमेरिका व इस्रायल विरोधात आहेत. या गटांकडे जनतेला मोठ्या प्रमाणात आंदोलनात उतरवण्याची ताकद?आहे. काही कट्टर इस्रायलविरोधी संघटनांवर बंदी लादली असून, त्यांचे नेते व कार्यकर्त्यांना अटक केली गेली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थकांकडूनही विरोधाची शक्यता आहे. ते मुनीर यांच्याशी सार्वजनिक मतभेदानंतर कारावासात आहेत. तरीही गाझा मिशनमध्ये सहभागाचा अंतिम निर्णय मुनीर हेच घेऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news