Armenia Parliament MPs Clash | आर्मेनियाच्या संसदेत खासदारांची हाणामारी; महिलांविषयी टिपणीने वाद पेटला

सत्ताधारी-विरोधकांत लाथाबुक्क्यांनी मारहाण
Armenia Parliament MPs Clash |
Armenia Parliament MPs Clash | आर्मेनियाच्या संसदेत खासदारांची हाणामारी; महिलांविषयी टिपणीने वाद पेटला
Published on: 
Updated on: 

येरेवन; वृत्तसंस्था : आर्मेनियाच्या संसदेत गुरुवारी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली. महिलांविषयी वादग्रस्त विधानावरून सुरू झालेला वाद वाढत जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

विरोधी पक्षाचे नेते नारेक कारापेटयन यांनी महिलांविषयी वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाचे खासदार तारोन चखोयान यांनी केली. त्यांनी कारापेटयन यांच्या कुटुंबाविषयीही टिपणी केली. त्यामुळे विरोधी संतप्त खासदारांनी सभापतींच्या आसनाकडे धाव घेतली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या खासदारांमध्ये संघर्ष वाढला. शाब्दिक वाद सुरू झाला; काही वेळात धक्काबुक्की आणि मारहाण सुरु झाली. या गोंधळात एक खासदार जमिनीवर पडले. सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून खासदारांना वेगळे केले. संसदेतील या घटनेचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित व्हायरल झाले आहेत.

सेक्स मंत्रालय स्थापन करण्याची केली होती सूचना

या वादाची पार्श्वभूमी विरोधी पक्षनेत्यांचे चुलत बंधू सरगिस कारापेटयन यांच्या जुन्या विधानाशी संबंधित आहे. कारापेटयन यांनी एका पॉडकास्टमध्ये महिलांचे लैंगिक समाधान आणि देशातील घटत्या जन्मदरावर बोलताना, आपल्या पक्षाची सत्ता आल्यास कोणतीही महिला लैंगिक समाधानापासून वंचित राहणार नाही, अशीही टिपणी केली होती. चर्चेत ‘सेक्स मंत्रालय’ स्थापन करण्याची विनोदी सूचनाही त्यांनी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.