Moon drifting away | आश्चर्य...! चंद्र पृथ्वीपासून दूर चाललाय! पृथ्वीवरील दिवस होणार २५ तासांचा

Moon drifting away
आश्चर्य...! चंद्र पृथ्वीपासून दूर चाललाय! पृथ्वीवरील दिवस होणार २५ तासांचाFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चंद्र अवकाशात हजारो शतकांपासून आहे. कलाकार, कवी, साहित्यिक आणि लहान मुलांना चंद्राने सतत भुरळ घातली आहे. पण आता संशोधकांनी चंद्राबद्दल नवे संशोधन केले. चंद्र हा पृथ्वीपासून हळूहळू दूर जात आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कोसिन - मॅडिसनमधील संशोधक चंद्रावरील ९ कोटी वर्षांपूर्वीच्या खडकांचा अभ्यास केला असून, त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचा पृथ्वीवर मात्र दूरगामी परिणाम होणार आहे.

संशोधकांनी काढलेल्या निष्कर्षांनुसार चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून ३.८ सेंटीमीटर इतक्या वेगाने दूर जात आहे. त्यानंतर भविष्यात म्हणजे २० कोटी वर्षांनंतर पृथ्वीवरचा दिवस हा २५ तासांचा होणार आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, १.४ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर दिवस फक्त १८ तासांचा होता. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षणामध्ये जे बदल होत आहेत, त्यामुळे असे घडत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

Moon drifting away
Super moon & Chandrayan 3 : सुपरमून आणि चांद्रयान ३ काय आहे संबंध ?

"जस जसा चंद्र दूर जाईल तस तसा पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग ही कमी होईल. स्वतः भोवती गिरकी घेणारे स्केटिंगपटू जेव्हा हात दूर करतात, तेव्हा त्यांची गती कमी होते, तसाच हा प्रकार आहे," असे या विद्यापीठातील प्राध्यापक स्टिफन मेयर्स यांनी म्हटले आहे.

Moon drifting away
Super Blue Moon 2023 : आज आहे ‘सुपर ब्लू मून’; खरोखरच चंद्र निळा दिसणार का? जाणून घ्या सविस्तर…

"आमचा उद्देश असा आहे की, प्राचीन जीऑलॉजिकल वेळा सांगू शकेल. अब्जावधी वर्षं जुने असलेल्या खडकांचा अभ्यास करता यावा आणि त्याचा उपयोग आताच्या भूगर्भ शस्त्राच्या अभ्यासात व्हावा, असे आम्हाला वाटते," असेही मेयर्स म्हणाले.

Moon drifting away
Earth and Moon : चंद्र नसता तर पृथ्वीचे काय झाले असते..?

चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे हा काही नवा शोध नाही. पण या विद्यापीठातील संशोधकांनी भूगर्भाशास्त्राच्या दृष्टिकोनातून या अभ्यासाची मांडणी केली आहे. प्राचीन काळातील भूगर्भीय रचनांचा अभ्यास करून संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील सिस्टमचा अब्जावधी वर्षांचा अभ्यास संशोधकांनी मांडला आहे. संशोधकांनी चंद्राचा पृथ्वीपासून दूर जाण्याचा जो वेग आहे, तो स्थिर असल्याचेही म्हटले आहे.

Moon drifting away
Earth-Moon : पृथ्वीपासून लांब जातोय चंद्र; ६० हजार किमीने वाढले अंतर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news