

पुढारी ऑनलाईन डेस्क : Michelle Trachtenberg | 'गॉसिप गर्ल' आणि 'बफी द व्हॅम्पायर स्लेअर' या मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. बुधवारी न्यूयॉर्क शहरातील राहत्या घरी तिचा मृतदेह आढळला. मिशेलवर नुकतेच यकृत प्रत्यारोपण झाले होते. तिच्या निधनाने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री मिशेल ट्रॅचटेनबर्गचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. मिशेलला लहानपणापासूनच अभिनयाच्या जगात रस होता. तिला अभिनयाच्या जगात स्वतःचे नाव कमवायचे होते. १९९१ मध्ये न्यू यॉर्कमध्ये 'लॉ अँड ऑर्डर' या मालिकेतील एका छोट्याशा भूमिकेने तिने अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९९६ मध्ये ती 'हॅरियर द स्पाय' या चित्रपटात पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसली. २००० मध्ये 'बफी द व्हॅम्पायर स्लेअर' मध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली आणि हेच तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वळण ठरले. यामध्ये तिने मुख्य पात्र मिशेल गेलरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर मिशेलने २००८ मध्ये 'गॉसिप गर्ल' या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारली. मिशेलने 'युरोट्रिप', '१७ अगेन' आणि 'द स्क्रिबलर' सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका केली.